रोजगार महाकुंभ महाराष्ट्र शासन अंतर्गत खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयांमध्ये रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते महाविद्यालयांमध्ये पदवी ते पदव्युत्तरतर सर्व अभ्यासक्रम उपलब्ध असून विद्यार्थी स्वतःच्या पायावर उभा राहून स्वतःचा व्यवसाय किंवा नोकरी करून आपले भवितव्य कसे घडवू शकतो यासाठी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर आहे असेही ते म्हणाले
या अभिनव उपक्रमाला संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी शुभेच्छा देत समाज उपयोगी असे उपक्रम सातत्याने घ्यावेत असे मत व्यक्त केले
रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव श्री आनंद छाजेड म्हणाले अलीकडच्या काळात महाविद्यालयाने सर्व स्तरावर उल्लेखनीय प्रगती केलेली असून प्रत्येक विद्यार्थ्याला रोजगार मिळावा हा संस्थेचा प्रमुख हेतू राहिला आहे
या भव्य मेळाव्यास टाटा मोटर्स, बजाज, मिड्राग्रुप, एस के युनिटिक, महिंद्रा, किर्लोस्कर , ॲक्सिस बँक, मुथूट फायनान्स, बालाजी ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड, कॉल फ्लेक्स, लाईट हाऊस अशा इतर ३७ नामांकित कंपन्यांनी सहभाग नोंदवला. तर ४०७ विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला त्यापैकी १०८ विद्यार्थ्याना अपॉइंटमेंट ऑर्डर देण्यात आल्या
मेळाव्याच्या आयोजन प्रसंगी प्राचार्य डॉ संजय चाकणे यांनी महाविद्यालयातील आगामी उपक्रमांची माहिती दिली तर रोजगार मेळाव्याचे समन्वयक उपप्राचार्य प्राध्यापक राजेंद्र लेले यांनी आलेल्या सर्व कंपन्यांचे प्रतिनिधी यांचे आभार मानले
याप्रसंगी संस्थेचे संचालक ॲड. अजय सूर्यवंशी, रमेश अवस्थी , जे. डी नाईक, जॉब कनेक्ट चे आर. एम .गायकवाड आणि आजी-माजी विद्यार्थी तथा सर्व महाविद्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
-अजय सूर्यवंशी




