पुणे पुस्तक महोत्सव आयोजित ग्रंथ दिंडी

खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडकी पुणे .

पुणे पुस्तक महोत्सव आयोजित ग्रंथ दिंडीमध्ये श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या विषयावर दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास विभागाचे 110 स्वयंसेवक दिंडीत सहभागी झाले. या दिंडीचं नियोजन स्थळ न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड ते फर्ग्युसन महाविद्यालय पुणे. न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड या ठिकाणावरून दिंडी प्रस्थान झाल्यावर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे दिंडीचा अनुभव घेतला. तसेच ज्ञानेश्वर महाराजांचा, टाळ , मृदुंग च्या गजरात , अभंगाचा जयघोष करत फर्ग्युसन महाविद्यालय पुणे येथे दिंडी पोहचली. विद्यार्थ्यांनी यावेळी फुगडी खेळून दिंडीत आनंद साजरा केला. पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक माननीय राजेश पांडे यांनी दिंडीतील विद्यार्थ्यांचे कौतुक केले. यावेळी खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय कृष्णकुमार गोयल साहेब ,संस्थेचे सचिव माननीय आनंद छाजेड साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, उपप्राचार्य डॉ. सुचेता दळवी, या मान्यवरांनी उपस्थित स्थळी आपल्या महाविद्यालयाचे दिंडीत सहभाग घेणाऱ्या विद्यार्थ्याचे कौतुक केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. निलेश काळे, प्रा. भागवत शिंदे , डॉ. अविनाश कोल्हे, डॉ. पद्माकर घुले, प्राध्यापिका कविता चव्हाण,यांनी योगदान दिले.

Scroll to Top