एक दिवसीय “डिझाइन थिंकिंग” कार्यशाळा

महत्त्वाची सूचना : सर्व तृतीय वर्ष (B. A. , B. Com. , B. Sc. , B. B. A. , B. C. A. ) आणि M. Com. , M. Sc. , M. A. (द्वितीय वर्ष) विद्यार्थी
एक दिवसीय “डिझाइन थिंकिंग” कार्यशाळेसाठी नोंदणी
एसपीपीयू एड्युटेक फाउंडेशन (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) आणि टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयाच्या शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता “डिझाइन थिंकिंग” या एक दिवसीय अनिवार्य कार्यशाळेचे आयोजन केले आहे. सदर कार्यशाळा शुक्रवार दि. 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9 वाजाता सुरु होईल.

केवळ आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून यासाठी कोणतेही शुल्क घेतले जाणार नाही. (विद्यार्थ्यांनी स्वतःचा जेवणाचा डबा आणि पाणी आणावे).
ही कार्यशाळा पूर्ण करणे सर्वांकरिता बंधनकारक करण्यात आलेले आहे.
कार्यशाळा पूर्ण झाल्यावर, यशस्वी/उत्तीर्ण विद्यार्थ्यांना स्किल इंडिया, MSSiDC, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार आणि RT MSSU यांच्याकडून विद्यार्थ्याच्या ईमेल आयडीवर प्रमाणपत्र जारी केले जाईल.
तरी शेवटच्या वर्षात शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी सोबतचा गूगल फॉर्म लगेच भरायचा आहे. नंतर बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी आपापले आधार कार्ड (प्रत्यक्ष हार्ड कॉपी) घेऊन महाविद्यालयात येऊन पडताळणी (Verification) करून घ्यावे.

डॉ. सुचेता दळवी, प्रा. महादेव रोकडे, प्रा. राजेंद्र लेले
(उपप्राचार्य )
प्रा. गौरी माटेकर
(आय क्यु ए सी समन्वयक)
डॉ. संजय चाकणे
(प्राचार्य)

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeHtt3HH3lY0CK_kMq0pRGY7uuH6gM6V359g86CU9p5yQ-8kQ/viewform?usp=header

Comments (0)

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top