DAY 1…!(MISSMATCH)

दिनांक 3 फेब्रुवारी 2026
आजच्या सांस्कृतिक सोहळ्याच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी संगणक शास्त्र विभागातर्फे तीन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये इ गेमिंग, मेकअप स्पर्धा, रील मेकिंग स्पर्धांचे नियोजन करण्यात आले. 100 पेक्षाही जास्त विद्यार्थ्यांनी इ गेमिंग स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. प्रत्येक टीम मध्ये चार विद्यार्थी अशा पद्धतीने 25 टीम मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन गेम खेळत होत्या आणि त्यातून तीन टीम्स फायनल पर्यंत पोहोचल्या .या इ-गेमिंग स्पर्धांचे परीक्षण भूगोल विभागाचे प्रमुख प्रा. शुभम पठारे आणि वाणिज्य विभागातील प्रा. मयूर कढणे यांनी केले. दुसऱ्या स्पर्धा होत्या मेकअप स्पर्धा यामध्ये दहापेक्षा जास्त विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. त्यातील तीन विद्यार्थिनींना पहिल्या तीन क्रमांकाची बक्षिसे देण्यात आली .याप्रसंगी बी.कॉम. बी.एम. विभागाच्या प्रमुख डॉ. शितल रणधीर आणि प्रा. मेहनाज कौशर यांनी परीक्षण केले. रील मेकिंग स्पर्धांना आजपासून सुरुवात झाली आणि यानंतर सात तारखेपर्यंत या स्पर्धा खुल्या राहणार आहेत. या सर्व स्पर्धांचे संगणक शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांमार्फत याचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर दिलेली जबाबदारी अगदी पूर्णपणे निभावली. सर्व स्पर्धा उत्साहात पार पडल्या. माननीय प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे सर यांचे प्रोत्साहन ,संगणक विभागाचे प्रमुख राजेंद्र लेले सर आणि सर्व प्राध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित हाताळल्या.संगणक शास्त्र विभागातील एफ .वाय .बी.एस्सी. मध्ये शिकणारी कुमारी प्रतीक्षा हिने गणेश वंदना नृत्य .सादर केली तसेच आदित्य नरवडे यांनी एक गीत सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कु.रुथ गायकवाड हिने सूत्रसंचालन केले.
संगणक शास्त्र विभाग

Comments (0)

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top