महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाअंतर्गत “टीजे चे चांगभलं” या थीमनुसार तिसऱ्या दिवशी ब्लॅक अँड व्हाईट डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या दिवशी बीबीए विभागाच्या वतीने विविध सांस्कृतिक व कौशल्याधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
बीबीए विभागाने रांगोळी स्पर्धा, प्रेमकविता वाचन स्पर्धा आणि संगीत खुर्ची स्पर्धा यांचे प्रभावी आयोजन केले. रांगोळी स्पर्धेमध्ये एकूण 90 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. ज्योती वाघमारे व प्रा. योगिता झोपे यांनी केले.
प्रेमकविता वाचन स्पर्धेत 50 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून प्रा. जुगल नाईक व डॉ. शैलेन्द्र काळे उपस्थित होते.
संगीत खुर्ची स्पर्धेमध्ये तब्बल 145 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे परीक्षण डॉ. स्वप्नील सटपुते व डॉ. पद्माकर घुले यांनी केले.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व व्यवस्थापन बीबीए विभागातील अपुर्वा, मानसी ठक्कर, जय गोथे, अथर्व दरेकर, आणि यश वाघेला, कार्यक्रम व्यवस्थापनात स्वयंसेवक म्हणून मेघराज मोरे, स्मिथ सुर्ते, अपुर्वा गजारे आणि सायली जेठीथोर यांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सांस्कृतिक विभाग प्रमुख व उपप्राचार्य प्रा. महादेव रोकडे सर तसेच उपप्राचार्या डॉ. सुचेता दळवी मॅडम यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते….या कार्यक्रमाचे मार्गदर्शन डॉ. शीतल रणधीर, प्रा. मेहनाज़ कौसर, प्रा. अमृता खेंदाड, प्रा. सोनाली गेडाम यांनी केले …
या कार्यक्रमास एकूण 442 विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला. ब्लॅक अँड व्हाईट डे मुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक जाणीव वाढीस लागली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बीबीए विभागातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी स्वयंसेवक व व्यवस्थापन यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
रांगोळी स्पर्धा



ब्लॅक अँड व्हाईट डे


