DAY 2…! (Ramp Walk)

महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाअंतर्गत “टी.जे.चं. चांगभलं” या सांस्कृतिक उपक्रमानुसार दुसऱ्या दिवशी कला विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक व कौशल्याधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. गौरी माटेकर , प्रा.दिशा वांबुरकर ,सांस्कृतिक विभाग प्रमुख व उपप्राचार्य प्रा. महादेव रोकडे, उपप्राचार्या प्रा.डॉ. सुचेता दळवी यांच्या शुभहस्ते झाले.

वाणिज्य विभागाने ट्रेजर हंट फोटोग्राफी व रॅम्प वॉक स्पर्धा आणि एकांकिका स्पर्धा यांचे प्रभावी आयोजन केले.
स्पर्धा या स्पर्धेमध्ये एकूण 74 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. सारिका मुंदडा, प्रा. अमृता खेंदाड आणि प्रा. सोनाली गेडाम यांनी केले.

यावेळी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक जाणीव वाढीस लागली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी स्वयंसेवक व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Comments (0)

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top