पुण्यात ‘वंदे मातरम्’ सुवर्णमहोत्सवी स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद
टिकाराम जगन्नाथ वरिष्ठ महाविद्यालय (स्वायत्त) खडकी,पुणे येथे,निबंध, वक्तृत्व, काव्यवाचन व पोस्टर स्पर्धांमधून विद्यार्थ्यांत राष्ट्रभक्तीची जागृती.
खडकी,पुणे, दि. २४ मार्च २०२६.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त), खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “वंदे मातरम् गीत शतकोत्तर सुवर्णमहोत्सव” निमित्त पुणे शहर विभागीय निबंध, पोस्टर, वक्तृत्व व काव्यवाचन स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या.
कार्यक्रमाची सुरुवात “वंदे मातरम्” गीताने झाली. प्रास्ताविकात डॉ. अविनाश कोल्हे यांनी कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. उद्घाटन सत्रात प्रमुख पाहुण्या ॲड. ईशानी जोशी यांनी “वंदे मातरम्” या गीतातून राष्ट्रभक्तीची प्रेरणा अधोरेखित केली, तर अध्यक्षीय भाषणात मा. कृष्णा भंडलकर यांनी विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीची जाणीव जोपासावी, असे आवाहन केले. प्रा. राजेंद्र लेले यांनी विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमधून अभिव्यक्ती विकसित करण्याचे मार्गदर्शन केले.
या स्पर्धांमध्ये पुणे शहरातील विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. बी. जे. महाविद्यालय, वाघोली, य. च. विधी महाविद्यालय, पुणे, प्रतिभा महाविद्यालय, चिंचवड, सी. के. गोयल महाविद्यालय, दापोडी, टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय, खडकी तसेच पुणे विद्यार्थी गृह या संस्थांनी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली.
स्पर्धांचे निकाल पुढीलप्रमाणे:
निबंध स्पर्धेत ऋषिकेश टेकाळे, युवराज कुमार, कु. प्रांजल श्रोती आदी विजेते ठरले. काव्यवाचनात गोविंद भांड, आशुतोष वसूमते, कु. हर्षदा गरुड यांनी बाजी मारली. पोस्टर स्पर्धेत कु. जान्हवी पवार व अविष्कार खडसे आघाडीवर राहिले, तर वक्तृत्व स्पर्धेत गोविंद भांड, समाधान झंझे व कु. सरस्वती जोशी यांनी उत्कृष्ट कामगिरी केली.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. कृष्णकुमार गोयल, उपाध्यक्ष मा. अनिल मेहता, सचिव मा. आनंद छाजेड तसेच सहसचिव तथा प्राचार्य डॉ. संजय चाकणे,संचालक मा. रमेश अवस्थे यांच्यासह सर्व संचालकांचे विशेष मार्गदर्शन लाभले. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अविनाश कोल्हे, प्रा. अर्चना तारू, प्रा. जितेंद्र मडके, तसेच एनएसएसचे सेवार्थी विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम सुनियोजित पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आय.क्यू. ए.सी. विभागाच्या समन्वयक प्रा. गौरी माटेकर तसेच प्रा.स्वामीराज भिसे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. अर्चना तारू यांनी केले.
“वंदे मातरम्” या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय लिखित गीताचा इतिहास व महत्त्व अधोरेखित करत हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, एकता आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणारा ठरला.

