आपल्या मातीचा अभिमान बाळगा – डॉ. पराग काळकर
आपल्या देशाच्या मातीला त्याग, देशप्रेमाचा सुगंध आहे. या मातीसाठी लाखो क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. पारतंत्र्यात असलेला आपला देश यामुळेच स्वातंत्र्य झाला. आपल्या देशाचा हा इतिहास विद्यार्थ्यांच्या आणि लहान मुलांच्या हृदयात रुजविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी देशभक्तीचा संस्कार आपण मुलांना द्यावा. त्यासाठी आपण आपल्या मातीचा अभिमान बाळगा असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.पराग काळकर यांनी व्यक्त केले. टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खडकी यांच्या वतीने आयोजित ‘मेरी माटी मेरा देश’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रवींद्र शिंगणापूरकर, श्रीमती बागेश्री मंठाळकर, डॉ.नितीन घोरपडे, डॉ.धोंडीराम पवार, खडकी कॅन्टोन्मेंटचे उपाध्यक्ष श्री. दुर्योधन भापकर, विद्यापीठाचे अधिसभा सदस्य श्री. प्रसेनजीत फडणवीस, श्री. राहुल पाखरे, खडकी शिक्षण घेत अध्यक्ष श्री. कृष्णकुमार गोयल, सचिव आनंद छाजेड, संस्थेचे संचालक, राजेंद्र भुतडा ,अनिल मेहता ,कमलेश पंगुडवाले ,धीरज गुप्ता, सुधीर फेंगसे, ज्ञानेश्वर मुरकुटे, मोहनलाल जैन, काशिनाथ देवधर, रमेश अवस्थी, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी बागेश्री मंठाळकर यांनी अपरिचित क्रांतिकारकांचा इतिहास आपल्या भाषणात मांडला. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी संस्था नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा विकास करत असल्याचे मत व्यक्त केले. या अभियानाच्या पार्श्वभूमीवर सुरतेची नक्षत्र उद्यान तयार केले असून मान्यवरांनी या उपक्रमाचे स्वागत केले. महाविद्यालयाने तयार केलेल्या अमृतकलशामध्ये सर्वांनी एक एक मुठ माती टाकून ‘मेरी माटी मेरा देश’ या अभियानात आपला सहभाग नोंदविला. तसेच कागदाच्या रद्दीपासून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या नव्या कागदाचे ग्रीटींग कार्ड मान्यवरांना भेट म्हणून देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव श्री. आनंद छाजेड यांनी मानले.