Testimonial_Others

Testimonial Others

नमस्कार सर 

                  आजचा मेरी माटी मेरा देश हा कार्यक्रम आपल्या महाविद्यालयामध्ये घेण्यात आला त्याचे नियोजन व कार्यक्रमाची सुसूत्रता अत्यंत योग्य होती तसेच आमच्यासारख्यांना प्रेरणादायी ठरेल अशाच प्रकारचा हा कार्यक्रम संपन्न झाला. आपले हार्दिक अभिनंदन 💐💐 तसेच आम्हाला कार्यक्रमाला निमंत्रित करून सन्मान केलात त्याबद्दल मनःपूर्वक आभार🙏🏻🙏🏻
 
प्रा डॉ धोंडीराम पवार 
सदस्य व्यवस्थापण समिती सदस्य 
सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ

11 thoughts on “Testimonial_Others”

  1. टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी पुणे याची स्थापना 1983 रोजी झाली तेव्हापासून आजपर्यंत महाविद्यालयाने विकासाचे प्रगतीचे अनेक टप्पे पार केले सुरुवातीला आर्ट्स कॉमर्स फॅकल्टी सुरू झाली त्यानंतर सायन्स बीबीए बीसीए ही फॅकल्टी सुद्धा सुरू झाली मी कॉलेजमध्ये एक ऑगस्ट 19 93 पासून अर्थशास्त्र विभागात रुजू आहे महाविद्यालयाचा विकासामध्ये त्यावेळी चे अध्यक्ष एडवोकेट एस के जैन आणि चंद्रकांत छाजेड तसेच कृष्णकुमार गोयल यांनी कॉलेजच्या विकासामध्ये प्रचंड काम केलेला दिसतोय कॉलेज दिवसेंदिवस अतिशय प्रचंड वेगाने खडकी दापोडी बोपोडी रेंज हिल्स विश्रांतवाडी येरवडा बोपखेल या परिसरामध्ये प्रचंड वेगाने विकसित होत आहे महाविद्यालयाचे वैशिष्ट्य म्हणजे गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी आमचे महाविद्यालय अतिशय कमी फी मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देते आणि त्यांना अत्याधुनिक पद्धतीने शिकवण्याचे काम महाविद्यालयाचे तज्ञ प्राध्यापक करत असतात आमचे विद्यमान अध्यक्ष माननीय दानशूर कृष्णकुमार सर यांनी अत्याधुनिक टेक्नॉलॉजी युक्त इंटर ऍक्टिव्ह बोर्ड महाविद्यालयाला देणगीचा स्वरूपात दिले आहे त्यामुळे डस्टर खडू यांचा वापर न करता अत्याधुनिक टेक्नॉलॉजी साह्याने विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम या ठिकाणी केले जाते गेल्या दोन वर्षापासून महाविद्यालयात प्रचंड बदल झालेले दिसते त्याचे प्रमुख कारण डायनामिक प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे यांच्या नेतृत्वात कॉलेज प्रचंड वेगाने विकसित होत आहे नवनवीन कोर्सेस महाविद्यालय सुरू करत आहे अर्थात संस्थाचालक यांचे मार्गदर्शन आणि सकारात्मक विचार यामुळेच हे शक्य आहे भविष्यात हे महाविद्यालय प्रचंड वेगाने विकसित होईल यात शंकाच नाही

  2. Shubham Patare

    “With its supportive community, cutting-edge resources, and innovative curriculum, TJ college empowered students.

  3. विजय घारे

    नमस्कार
    दिनांक २६ जून २०२४ रोजी आपल्या महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापकांची
    नेमणूक करणे संदर्भात विषय तज्ञ म्हणून उपस्थित असताना मा प्राचार्य डॉ संजय चाकणे व संस्थेचे पदाधिकारी यांचे शिक्षण क्षेत्रात देत असलेले
    योगदान प्रकर्षाने जाणवले.
    मा प्राचार्य डॉ संजय चाकणे सरांचा शिक्षण क्षेत्रातील अनुभवाचा संस्थेसाठी उपयोग होत असल्याचे संस्थेत काम करणारे अध्यापक नमूद करीत होते.
    मा डॉक्टर संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय योग्य दिशेने वाटचाल करीत आहे.

    सर्वांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
    💐💐💐

    विजय घारे
    विभाग प्रमुख,गणित विभाग
    पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे
    बाबुरावजी घोलप महाविद्यालय
    सांगवी पुणे २७.

  4. Dr.Nitin laxman Ghorpade

    आपल्या महाविद्यालयाच्या वतीने आपण नवीन शैक्षणिक धोरण पदवी स्तरावर 2024 25 या शैक्षणिक वर्षापासून चांगल्या पद्धतीने अंमलबजावणी व्हावी म्हणून पुणे शहरातील प्राचार्य आणि संचालक यांच्यासाठी उत्कृष्ट कार्यशाळा आयोजित केली होती .त्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. सुरेश गोसावी सर , उप कुलगुरू डॉ. पराग काळकर आणि सर्व शाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. या कार्यशाळेच्या उत्कृष्ट आयोजना बद्दल प्राचार्य संजय चाकणे सर आणि आयोजन समितीतील सर्व अध्यापकांचे हार्दिक अभिनंदन..
    प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे
    व्यवस्थापन समिती सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

  5. PROF. MEHNAZ KAUSHAR

    1. At Tikaram Jagannath College, we are dedicated to fostering both academic excellence and personal growth. Our students benefit from a supportive and dynamic learning environment that encourages them to reach their full potential in every aspect of their lives.

    2. We believe in the importance of a well-rounded education. Our students are encouraged to participate in a variety of extracurricular activities that help them develop leadership skills, build teamwork, and create lasting memories. Their active involvement in these activities is a testament to their enthusiasm and commitment.

    3. As faculty members, we take great pride in mentoring our students and guiding them toward their career goals. Our supportive and collaborative approach helps students navigate their academic journeys with confidence and prepares them for future success.

  6. Prof.Nitin. Dattatray Pailwan

    साधारणपणे 40 वर्षांपूर्वी खडकी आणि परिसरातल्या मुलांना उच्च शिक्षण मिळावं यासाठी एडवोकेट एस के जैन आणि स्वर्गीय आमदार चंद्रकांत जी छाजेड यांच्या प्रयत्नातून टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाची स्थापना झाली. तत्कालीन प्राचार्य आणि सर्व प्राध्यापक वर्गांनी प्रचंड मेहनत घेऊन कॉलेजची धुरा सांभाळली. कालपरत्वे संस्थेचे अध्यक्षपदी कृष्णकुमार जी गोयल आणि सचिव पदी श्री आनंद चंद्रकांत छाजेड यांची नियुक्ती झाली. आणि इथेच संस्थेचा टर्निंग पॉईंट ठरला गेला .आणि संस्थेच्या दृष्टिकोनात अचानक बदल झाला, की खडकी आणि परिसरातल्या मुलांना फक्त उच्च शिक्षण नको तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण कसं प्राप्त करून देता येऊ शकेल याचा विचार विनिमय माननीय कृष्णकुमार गोयल जी आणि श्री आनंद छाजेड यांच्यात सुरू झाला . आणि याच कालावधीत नवीन प्राचार्य पदी डॉक्टर संजय चाकणे यांचं आगमन झाले बहुआयामी व्यक्तिमत्व असलेले डॉक्टर संजय यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना फक्त उच्च शिक्षणच नव्हे तर त्यांचक्तिमत्त्व कसं बहरता येऊ शकेल यासाठी विविध उपक्रमांची साखळी तयार केली, मग ते एनएसएस असो, ते एनसीसी असो ,रेडीओ डीजे असो, पुरुषोत्तम करंडक ,असो कवी कट्टा असो असे अनेक विविध उपक्रम ते राबवत आहेत विविध प्रतिभा शाली लोकांची व्याख्यान असो गड किल्ले यांच्या भेटी असो या माध्यमातून विद्यार्थ्यांना बोलत कसा करता येऊ शकेल. सातत्याने प्राध्यापकांच्या माध्यमातून पाठपुरावा केला जातो. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय दर्जाचा शिक्षण …… इंटर ऍक्टिव्ह बोर्ड ….ज्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सखोल ज्ञान प्राप्त होईल हे आदरणीय प्राचार्यांच्या लक्षात आलं. मग प्रत्येक वर्गामध्ये माननीय कृष्णकुमार गोयल आणि श्री आनंद छाजेड यांच्या माध्यमातून ते इंटरॅक्टिव बोर्ड उपलब्ध करून दिले गेले या महाविद्यालयातून बाहेर पडणारा विद्यार्थी हा फक्त डिग्री घेऊन बाहेर पडत नाही तर तो एक कणखर नेतृत्व कसा होऊ शकेल की दिलेली जबाबदारी यशस्वीपणेच पार पाडायची . हे त्याच्या नसानसात इथल्या प्राध्यापकांच्या माध्यमातून गिरवलं जातं. इथले नवीन आलेले प्राध्यापक अतिशय मेहनती आणि विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करणारे आहेत .जुन्या प्राध्यापकांचा मार्गदर्शन त्यांना मिळतच आहे. जुन्या आणि नव्या प्राध्यापकांचा खूप चांगला समन्वय डॉक्टर संजय चाकणे यांनी करून दिला आहे. कोहिनूर….. आपल्या भारतीयांच्या मनात या हिऱ्याविषयी एक आगळ वेगळं स्थान आहे. आणि आमचे कोहिनूर आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्रीकृष्ण कुमार गोयल……. यांनी आपल्या आयुष्यामध्ये एकच टार्गेट ठेवलं होतं जे मिळवीन ते सर्वोत्कृष्ट …..आणि खडकी शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष पदांची धुरा हाती घेतल्यापासून या क्षणापर्यंत आपल्या संस्थेला सर्वोत्कृष्ट कसं करता येऊ शकेल ,याचा ते सातत्याने विचार करत आहेत आपले मनःपूर्वक आभार . या खडकी परिसरातील गोरगरीब विद्यार्थ्यांचा फार मोठा आशीर्वाद आपल्या त्रिस्तरींना म्हणजेच माननीय अध्यक्ष कृष्णकुमार जी गोयल साहेब माननीय आनंदजी छाजेड डॉक्टर संजय चाकणे यांना पुनश्चा आपले मनःपूर्वक आभार.

  7. खडकी शिक्षण संस्था म्हणजे मानद अध्यक्ष एस. के.जैन, स्वर्गीय चंद्रकांतजी छाजेड व अध्यक्ष कृष्णकुमार गोयल याच्या रूपाने लाभलेले त्रिरत्न. याच संस्थेतील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय हे 1983 साली स्थापन झालेले विद्येचे माहेरघर येथे अनेक नावजेलेल विद्यार्थीप्रिय प्राचार्य होऊन गेले, जून 2022 पासून डॉ.संजय चाकणे यांनी महाविद्यालयाची धुरा अतिशय उत्तमपणे हाताळली आहे. महाविद्यालयात शिकवण्याची छान अशी पद्धत, उत्तम असे ग्रंथालय ज्याला आपण सध्या ज्ञानस्त्रोत केंद्र असे संबोधले जाते. येथे आरामात 100 वाचक बसू शकतील, कार्यशील असे कार्यालय, खेळाची अनेक वर्षांची परंपरा यामधे सलग 33 वर्ष हॉकी स्पर्धेत मक्तेदारी. असे हे आपले आणि सर्वांचे हक्काचे, गोर गरीब जनतेचे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हिताचे महाविद्यालय म्हणजे T.J. College….

  8. या महाविद्यालयामधील प्रत्येक प्राध्यापकामध्ये अशी क्षमता आहे की त्याच्या मनात वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक कल्पना जन्माला येतात त्यामुळे महाविद्यालयाचा विकास भरदाव वेगाने सुरू आहे त्यात प्राचार्य डॉ चाकणे यांचे मिळालेले मार्गदर्शन सर्वांसाठी लाभदायी ठरत असल्याने महाविद्यालय विकासात मोठ्या प्रमाणात भर पडत आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top