महादेव रोकडे
मराठी विभाग प्रमुख
मराठी विभाग
“जे जे सर्वोत्तम आहे ते ते मराठीतच आहे, ‘मराठीपण’ आपले सांस्कृतिक संचित आहे “. या सुभाषिताप्रमाणे मराठी भाषा, साहित्य, संस्कृती, परंपरा यांचा सखोल अभ्यास करण्यासाठी १९९२ पासून ‘मराठी’ विषयाचा प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. काव्यलेखन, कथालेखनाची आवड असून कथासंग्रह (१९८८) एक काव्यसंग्रह एकदा (थोडी सावली,थोडी ऊन), बंधुतायण (संपादित वैचारिक ग्रंथ) प्रकाशित असून, महाराष्ट्रभर विविध विषयांवर व्याख्याने दिलेली आहेत. माझ्या शैक्षणिक कार्याबद्दल राज्यस्तरीय/ राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेले आहे.
प्रारंभापासून मला मराठी भाषेची आत्यंतिक आवड असून मराठी भाषा, साहित्य, कला संस्कृती, परंपरा यांची जोपासना व संवर्धनासाठी सातत्याने मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी विविध अभिनव उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्त्व, वादविवाद, हस्ताक्षर, निबंध, अशा विविध स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी शैक्षणिक उपक्रमाबरोबरच विविध सांस्कृतिक उपक्रम राबविलेले आहेत. “शिक्षक ज्याला ‘शिक्षक’ व्हायचे आहे त्याचा प्रधान हेतू…. स्वतःची मते विद्यार्थ्यांच्या मनावर ठसवणे, हा नसून विद्यार्थ्यांचे मन चेतवणे हाच असला पाहिजे ही माझी भूमिका आहे.”
पदवी | बोर्ड/विद्यापीठ | शैक्षणिक वर्ष | गुण / श्रेणी |
एस.एस.सी. | विभागीय मंडळ, पुणे | १९८३ | द्वितीय श्रेणी |
एच.एच.सी. | विभागीय मंडळ, पुणे | १९८५ | द्वितीय श्रेणी |
बी.ए. | पुणे विद्यापीठ, पुणे | १९८८ | द्वितीय श्रेणी |
एम.ए.(मराठी) | पुणे विद्यापीठ, पुणे | १९९० | उच्च द्वितीय श्रेणी |
नेट | यु.जी.सी.दिल्ली | १९९३ | उत्तीर्ण |