टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय, खडकी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठस्तरीय सांस्कृतिक कार्य अधिकारी यांची कार्यशाळा संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील २२८ सांस्कृतिक कार्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य सल्लागार राजेश पांडे, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य बागेश्री मंठाळकर, खडकी शिक्षण संस्थेचे सचिव आनंद छाजेड, प्राचार्य डॅा. संजय चाकणे उपस्थित होते.