टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या प्राध्यापकांची १२ पेटंट दाखल

पुणे, १-५-२०२४

पुण्यातल्या खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील ९ प्राध्यापकांनी एकाच दिवशी विविध विषयावरील नावीन्यपूर्ण अशी १२ पेटंट मुंबईच्या बौद्धिक संपदा कार्यालयात नुकतीच दाखल केली.

“एकाच वेळी एखाद्या महाविद्यालयातील ९ प्राध्यापकांनी १२ पेटंट एकत्र दाखल करणे ही घटना दुर्मिळ अशीच आहे. यामुळे अन्य प्राध्यापकांना आणि युवा वर्गालाही नवी प्रेरणा मिळून नवनवीन कल्पना आणि संशोधन पुढे येण्यासाठी मदतच होईल” असे उद्गार माजी कुलगुरू डॉ. अरुण अडसूळ यांनी व्यक्त केले. आज १ मे रोजी या सर्व प्राध्यापकांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष श्री. कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते आणि डॉ अरुण अडसूळ, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. काशीनाथ देवधर यांच्या उपस्थितीत महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आला. यावेळी संस्थेतील सर्व शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य डॉ. संजय चाकणे उपप्राचार्य प्रा. राजेंद्र लेले, डॉ. आहेर, प्रा. स्वामिराज भिसे आणि पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. संजय चाकणे यांची २, प्रा. राजेंद्र लेले यांची २, प्रा. महेनाज कौशर यांची २, आणि प्रा. शुभांगी पाटील, प्रा. अर्चना तारु, प्रा. प्रियांका बनकर, डॉ. निलेश काळे, डॉ. तेजस्विनी शेंडे, प्रा. शुभम पटारे यांची प्रत्येकी १ पेटंट फाईल करण्यात आली. कदाचित देशातील अशी ही पहिलीच घटना आहे असे मत डॉ. चाकणे यांनी व्यक्त केले.

Scroll to Top