कोण म्हणतं तरुण पिढी वाचत नाही!विशेषत:पुस्तके वाचत नाहीत?
पुण्यामध्ये राष्ट्रीय पुस्तक न्यास आणि पुणे ग्रंथ महोत्सव यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन झालेले आहे, वास्तविक 16 तारखेला संध्याकाळी या महोत्सवाचे उद्घाटन झाले ! परंतु पुणेकरांनी आज सकाळपासूनच प्रचंड गर्दी केली …दीडशे पेक्षा जास्त स्टॉल असलेल्या या प्रदर्शनात सर्व प्रकारची पुस्तके आहेत सर्व भाषांमधली पुस्तके आहेत ..आपली आवड बघावी ,आणि पुस्तकाचा स्टॉल शोधावा !आज दिवसभरात वीस हजारापेक्षा जास्त लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली. यामध्ये तरुणांची संख्या मोठी होती…
मी, प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर आणि प्राचार्य देविदास वायदंडे असं फर्ग्युसन समोर अण्णा नावाच्या हॉटेलमध्ये चहा पीत बसलो होतो तेवढ्यात दोन मुली पळत आल्या आणि आमच्या गळ्यातले आय कार्ड बघून त्या म्हणाल्या तुम्ही आयोजक आहात ना ? आमच्यातील एक जण हो म्हणाला …त्यांनी गाडीतून चार छोट्या कुंड्या आणल्या . हॉटेलमध्येच आमचा सत्कार केला !!! उत्कृष्ट पुस्तकांचे नियोजन केले म्हणून आम्हाला कोण आनंद झाला !!!!
मला वाटते पुणे बदलत आहे
पुणे वाचते आहे
पुणेकर वाचतायेत
पुणेकर वाचायला भाग पाडत आहेत
येत्या 24 तारखेपर्यंत जरूर भेट द्या !!!!
पुस्तके विकत घ्या
विकत घ्यायला लावा वाचा
पुणे पुस्तक महोत्सव आयोजन समिती