सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळ.
आणि
खडकी शिक्षण संस्थेचे, टिकाराम जगन्नाथ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खडकी, पुणे ४११००३.
आयोजित
” स्वररंग २०२३ विभागीय युवक महोत्सव”
दिनांक २५ सप्टेंबर २०२३
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाच्या वतीने घेतला जाणारा स्वररंग विभागीय युवक महोत्सव सलग दुसऱ्यांदा आयोजनाचा मान यंदा पुनश्च आपल्या खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला मिळाला.
स्वररंग स्पर्धेच्या पहिल्या सत्रात उद्घाटन सोहळा पार पडला
… महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी व्यासपीठावरील मान्यवरांचा तुळशी वृंदावन देऊन स्वागत केले.
आपल्या प्रास्ताविक परिचयामध्ये डॉ. चाकणे सर यांनी विविध महाविद्यालयातून आलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनी स्पर्धक, स्पर्धासंघाचा आणि संघ समन्वयकांचे तसेच स्पर्धक परीक्षक,मान्यवरांचा आपल्या दीलखुलास शैलीतून परिचय करून दिला.
स्वररंग विभागीय युवक महोत्सवाच्या पार्श्वभूमीविषयी बोलताना प्राचार्य डाॕ.चाकणे सर म्हणाले,गेल्या २९ वर्षात विविध सांस्कृतिक स्पर्धा सुमारे३२ विविध कला प्रकारात राज्यनियुक्त इंद्रधनुष्य नावाने आयोजित केली जात आहे. आज या स्पर्धेचे स्वरूप विस्तारलेले आहे.आजच्या या स्वररंग विभागीय युवक महोत्सवातून विजेते झालेले स्पर्धक पुढे सहा विभागातून आलेल्या सुमारे एक हजार स्पर्धकांच्या, कलावंतांशी स्पर्धा करतील. त्यातून ४० विजयी स्पर्धकांची इंद्रधनुष्य या स्पर्धेसाठी निवड केली जाईल.यानंतर पुढे वेस्ट झोन, नॅशनल झोन,आणि सर्वोच्च इंटरनॅशनल झोन अशा पद्धतीने या स्पर्धेचा आलेख अतिशय विस्तारलेला होईल. सरांनी प्रत्येक स्पर्धक विद्यार्थ्याला यासाठी मनहृदयापासून शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या भूमिकेतून स्पर्धकांनी स्पर्धा केली पाहिजे ही स्पर्धा निकोप स्पर्धा व्हावी यासाठी प्राचार्य डाॕ.चाकणे सरांनी स्पर्धक विद्यार्थी-विद्यार्थिनी कलावंतांना..” तुम्ही सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे विद्यार्थी आहात! म्हणजेच प्रत्येकजण हा सावित्रीची लेक,मूल आहे.तेव्हा प्रत्येकाने मी सावित्रीच्या पोटी जन्मलो आहे लेख आहे जाणिवेतूनच स्पर्धा यशस्वी करावी!.. झाली पाहिजे. आपल्या मनावर तो ठसा उमटवला पाहिजे. शिवाय तुम्ही स्पर्धेत स्पर्धक कलाकार आहात तसेच कल्लाकार आहात पण कल्लाकारी अतिशय उत्कृष्ट,निकोप साजरी व्हावी…! प्राचार्य डॉ.चाकणे सर यांनी आपल्या प्रास्ताविक मनोगतातून अशा शुभेच्छा दिल्या.
यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. अभिजीत कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून स्वररंगाची मनावर पडलेली भूल खूप छान पद्धतीने विद्यार्थी कलावंतांसमोर व्यक्त करताना शुभेच्छा दिल्या. स्वतः कुलकर्णी सर विज्ञान शाखेचे विद्यार्थी शिवाय सतत वैज्ञानिक अंगाने प्रयोगाशील असलेले कुलकर्णी सर कलेच्या क्षेत्रात गेल्या काही दिवसापासून स्वररंगाच्या सहवासात आल्यापासून कसे रंगले याचे हृदयस्पर्शी अनुभव कथन अतिशय मिष्कीलपूर्ण शैलीत केले. ..”पुढच्या स्वररंगमध्ये मी खास ढोलकी वादन शिकून सहभाग घेणार आहे ही उर्मी सुद्धा त्यांनी व्यक्त केली.”
यानंतर स्वररंगाच्या प्रमुख समन्वयक,सा.फु.पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापक समितीच्या सदस्या मा. बागेश्री मंठाळकर यांनी आपल्या मनोगतातून स्वां:ताय सुखाःमय. अशा पद्धतीने स्पर्धेत सहभाग घ्या आणि यशस्वी व्हा अशा शुभेच्छा दिल्या. स्पर्धेसाठी स्पर्धा व्हावी आणि या स्पर्धेतून अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावरची विजयाची ढाल आपल्या सांस्कृतिक पुणे शहराला आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला मिळावी या अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्या.
खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिक्षणप्रेमी, ज्येष्ठ उद्योजक श्री कृष्णकुमारजी गोयल, यांनी स्वरबंग 2023 विभागीय युवक महोत्सव या स्पर्धेचे उद्घाटन केले उद्घाटन पर मनोगतात गोयल सर यांनी कॉलेज जीवनाचे कलागुणांच्या विविध जाणीवांचे व्यवहाराशी,जगण्याशी सहसंबंध लावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.आपल्या सुप्त शक्तीला जागृत करून आपली इच्छाशक्ती प्रबळ करा आणि जीवनाच्या विविध क्षेत्रात मोठे व्हा नावलौकिक मिळवा हा संदेश त्यांनी आपल्या उद्घाटनिय मनोगतातून स्पर्धकांना दिला.
यावेळी व्यासपीठावर रा.से.यो.चे डॉक्टर तुषार चांदवडकर उपस्थित होते.
खडकी शिक्षण संस्थेचे सचिव श्री आनंदजी छाजेड आणि मान्यवर संस्था पदाधिकारी यांच्या पाठबळातून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे सर यांच्या मार्गदर्शनातून महाविद्यालयीन प्राध्यापक-प्राध्यापकत्तर वृंद,कार्यालयीन कर्मचारी,सेवक वर्ग यांच्या अथक् परिश्रमातून स्वररंग २०२३ अतिशय उत्साहाने जल्लोषात सुरु झाला..
स्वररंग विभागीय युवक महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य आणि ललित कला अशा एकूण पाच प्रमुख कला प्रकारांचा समावेश आहे.
संगीत विभागातून सुगम संगीत, समूह गायन, शास्त्रीय गायन, उपशास्त्रीय गायन,भारतीय स्वर वाद्य वादन,तालवाद्य वादन, पाश्चिमात्य वैयक्तिक गीत, पाश्चिमात्य समूहगीत,आणि लोक वाद्यवृंद या कलाप्रकारांचा समावेश आहे.
नृत्य विभागातून वैयक्तिक नृत्य/ संहिता नृत्य /संकल्पना नृत्य,लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य यांचा समावेश आहे.
नाट्य विभागात एकांकिका, लघुनाथटिका,मूकनाट्य,एकपात्री, मिमीक्री या कलांचा समावेश आहे.
साहित्यकलेत प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद, यांचा समावेश आहे.
ललित कला विभागात स्थळचित्र, कोलाज, भित्तिपत्रक, मातीकला, व्यंगचित्र, रांगोळी, मेहंदी, स्थळ छायाचित्र आणि मांडणी कला यांचा समावेश आहे.
अशा एकूण पाच कलाप्रकारातील २९ उपकलाप्रकारांमध्ये विविध ४० महाविद्यालयातील सुमारे ८०० महाविद्यालयीन युवक युवती कलावंतांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला आहे. अशी माहिती स्वररंग युवा महोत्सवाचे आयोजक निमंत्रक महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्राध्यापक स्वामीराज भिसे सर यांनी दिली
This is inspireable
IT is inspireable