सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खडकी यांच्या द्वारा आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ महिला हॉकी स्पर्धेस रविवार दिनांक 28 जानेवारी पासून मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम नेहरू नगर पिंपरी येथे मोठ्या उत्साहात सुरुवात झाली या स्पर्धेमध्ये देशभरातून विविध राज्यातील 16विद्यापीठांचे महिला हॉकी संघ सहभागी झाले आहेत. आज यापैकी बारा संघांचे सहा सामने पार पडले यामध्ये प्रथमतः के. आय. आय. टी. विद्यापीठ भुवनेश्वर विरुद्ध आय. टी. एम. विद्यापीठ ग्वालियर यांचा सामना रंगला या सामन्यात आय. टी. एम. विद्यापीठ ग्वालियर हा संघ 0 -11 अशा फरकाने एकतर्फी विजय झाला. यानंतर दुसरा सामना पंजाब विद्यापीठ चंदीगड विरुद्ध रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ भोपाळ यांचा सामना झाला या सामन्यात रवींद्रनाथ टागोर विद्यापीठ भोपाळ या संघाचा 0-2 या अंतराने विजय झाला. यानंतर तिसरा सामना पंजाब विद्यापीठ पटियाला विरुद्ध रांची विद्यापीठ रांची यांचा सामना झाला. सामन्यात रांची विद्यापीठ रांची या संघाचा 3-5 या फरकाने विजय झाला तर चौथा सामना वीर बहादुर सिंग पूर्वांचल विद्यापीठ जोनपुर विरुद्ध गुरुनानक देव विद्यापीठ अमृतसर यांच्यात अत्यंत चुरशीचा सामना झाला या सामन्यात दोन्ही संघ तोडीस तोड असल्या कारणाने सदर सामना 2-2असा बरोबरीत सुटला.
यानंतर पाचवा सामना एम.डी. विद्यापीठ रोहतक विरुद्ध कलकत्ता विद्यापीठ यांच्यात झाला या सामन्यात एम.डी. विद्यापीठ रोहतक हा संघ 6-0 या फरकाने विजयी ठरला तर आजचा अंतिम सामना जिवाजी विद्यापीठ आणि मद्रास विद्यापीठ यांच्या यांच्यात पार पडला.या सामन्यात जिवाजी विद्यापीठ ग्वालियर चा संघ 8-1 या फरकाने विजयी ठरला अशी माहिती महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ.महेश बेंडभर यांनी दिली.
सदर राष्ट्रीय महिला हॉकी सामन्यांसाठी यशवंतराव चव्हाण रुग्णालय आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांचे विषय सहकार्य लाभले.