खडकी शिक्षण संस्थेच्या शिरपेचात गिनीज विश्वविक्रम

पुणे – राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने भारत हा शब्द सुमारे ७५०० पुस्तकांनी लिहून, सौदी अरेबियाचा रेकॉर्ड मोडण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यात खडकी शिक्षण संस्थेने भारत शब्दाने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. या विश्व विक्रमानंतर आकाशात फुगे सोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी नॅशनल बुक ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद मराठे, संचालक युवराज मलिक, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, भाजप नेते माधव भांडारी, संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सचिव आनंद छाजेड, तसेच संस्थेचे संचालक, प्राचार्य डॉ. संजय चाकणे आदी उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल म्हणाले की, हा सन्मान संपूर्ण खडकी दापोडी बोपोडी आणि या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या खडकी शिक्षण संस्थेतील प्रत्येक व्यक्तीचा हा सन्मान असून या निमित्ताने खडकी शिक्षण संस्था ही आता पुन्हा एकदा नव्या जोशात आपले सामर्थ्य सिद्ध करत आहे. अशा पद्धतींच्या विक्रमांमुळे काम करण्याची प्रेरणा मिळत राहते.

Scroll to Top