टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा जिल्हास्तरीय सांस्कृतिक व साहित्यिक स्पर्धेमध्ये सहभाग

खडकी शिक्षण संस्था टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडकी पुणे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्राध्यापक रामकृष्ण मोरे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी पुणे जिल्हास्तरीय सांस्कृतिक व साहित्यिक स्पर्धेत एकूण पाच विद्यार्थी सहभागी झाले. विद्यार्थ्यांनी काव्यवाचन स्पर्धा पोस्टर्स स्पर्धा निबंध स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत सदर स्पर्धेसाठी जाण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले आणि उत्तम मार्गदर्शन करण्यात आले त्यामुळे महाविद्यालयातील एका विद्यार्थ्याचे जिल्हास्तरीय सांस्कृतिक साहित्यिक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे सिलेक्शन झालेले आहे. तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे मार्फत सदर विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात येत आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धांसाठी आणि वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेचे विश्वस्त तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभाग सल्लागार समितीचे सदस्य माननीय रमेश अवस्थी सर ,राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश काळे, डॉ. पद्माकर घुले , प्राध्यापिका अर्चना तारू उपस्थित होते.

Scroll to Top