खडकी दि. 26 : कोणत्याही महाविद्यालयाने यापूर्वी वार्षिक नियतकालिकामध्ये न आलेला ‘मैत’ विषय घेतलेला आहे, हा एक आगळा वेगळा आणि ‘हटके’ विषय विद्यार्थ्यांना देऊन संपादक मंडळाने विद्यार्थ्यांना लिहायला प्रवृत्त केले याचा अधिक आनंद होतो आहे. विविध जाती धर्मामध्ये जन्म संस्कार व मृत्यू विधीच्या संकल्पना वेगवेगळ्या आहेत. हिंदू धर्मामध्ये मृत्यू विषयीच्या विविधचाली, रीती, रूढी,परंपरा जशा आहेत, उदाहरणार्थ अंत्यसंस्कार सावरण्याचा विधी, दशक्रिया विधी,तेरावा याप्रमाणेच मुस्लिम ख्रिश्चन शीख, जैन व बौद्ध धर्मीयांच्याही मृत्यूनंतरच्या विधी विषयीची माहिती या विशेष अंकामध्ये विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण अशी दिलेली आहे. त्याबद्दल मनापासून आनंद वाटला, महाराष्ट्रातील संपूर्ण महाविद्यालय विश्वामध्ये असा आगळावेगळा विषय वार्षिक नियतकालिकासाठी नक्कीच यापूर्वीही आलेला नसेल,याची खात्री आहे खरे तर जगणं खूप सुंदर आहे,परंतु अखेरचा निरोप घेताना मरणालाही हसत हसत सामोरे जावे हेच खरे सत्य आहे. ” असे प्रतिपादन खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कुमार गोयल यांनी केले
खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या मैत या विषयावरील वार्षिक नियतकालिकाचे प्रकाशन आज श्री कृष्णकुमार गोयल यांच्या हस्ते झाले, यावेळी भारत भारतीया संस्थेचे पुणे जिल्हाध्यक्ष श्री.अचल जैन, भारत भारती पुणे शहराचे समन्वयक श्री समीर पंड्या, श्री किरण अस्तगावकर, खडकी शिक्षण उपाध्यक्ष अनिल मेहता, चिटणीस आनंद छाजेड, रमेश अवस्थे, राजेंद्र भुतडा, प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्राचार्य डॉ संजय चाकणे यांनी या विषयाची अभिनव संकल्पना या मनोगतातून सांगितली.
श्री. अचल जैन यांनीही हा वेगळ्या धाटणीचा विषय वार्षिक नियतकालिका मधून महाविद्यालयाने हाताळलेला आहे. हा अंक वृत्तपत्रानी नोंद घेण्यासारखाच आहे, असे गौरवोदगार काढले.
उपप्राचार्य महादेव रोकडे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले.




राष्ट्र प्रथम मानणारी पिढी तयार झाली पाहिजे
कृष्णकुमार गोयल
खडकी दि. 26 : राष्ट्र प्रथम, आणि राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतून सर्वांनी राष्ट्रासाठी काम करणे, हे अत्यंत महत्त्वाचे असून येणाऱ्या काळात, राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती हेच एकमेव ध्येय ठेवून राष्ट्रासाठी आपला उभा जन्म देणारी पिढी तयार व्हायला हवी. भारत भारतीचा उपक्रम या दृष्टीने अखंड भारतात झाला पाहिजे, असे गौरव उद्गार श्री.कृष्णकुमार गोयल यांनी काढले
खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयामध्ये भारत भारती या संस्थेच्या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याचा समारंभ आज आयोजित करण्यात आला होता, यावेळी भारतभारतीचे पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष श्री.अचल जैन,
भारत भारती चे पुणे जिल्ह्याचे समन्वयक समीर पंड्या, किरण अस्तगावकर, उपाध्यक्ष अनिल मेहता, खडकी शिक्षण संस्थेचे चिटणीस आनंद छाजेड, संस्था पदाधिकारी रमेश अवस्थे राजेंद्र भुतडा आणि संस्थेचे सहसचिव प्राचार्य डॉ.संजय चाकणे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी श्री.अचल जैन यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की,
समाजामधील विविध जाती धर्मांमध्ये जातीय सलोखा आणि शांतता नांदावी सर्वांनी बंधुभावाने वागावे यासाठी भारत भारती ही संस्था कार्य करत आहे,आणि त्या दृष्टीने भारत भारतीय संस्थेचे समाजासाठी योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.
भारत भारतीय संस्थेच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकमेकाशी मित्रत्वाची आणि बंधुतेची भावना ठेवून एकमेकांच्या घरी राहणे निवास करणे आणि एकमेकांच्या चालीरीती रूढी परंपरांमध्ये समरस व्हावे, असे श्री. समीर पंड्या यांनी सांगितलले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन केल्यानंतर एन.एस एस कार्यक्रमाधिकारी डॉ. निलेश काळे यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी केले.
भारत भारतीय उपक्रमामध्ये सहभागी झालेली राष्ट्रीय सेवा योजनेची विद्यार्थिनी कुमारी व्हिक्टोरिया जोसेफ हिने
प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले भारत भारतीच्या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरित करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन उपप्राचार्य महादेव रोकडे यांनी केले तर प्रा.अर्चना तारू यांनी आभार प्रदर्शन केले.