पुणे शहर व पुणे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व सचिव चर्चासत्र

“ज्येष्ठांच्या ज्ञान,अनुभव आणि परिपक्वतेचा उपयोग समजासाठी करूया..!”डॉ. तेज निवळीकर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, आणि बहि:शाल शिक्षण मंडळ,ज्येष्ठ नागरिक कक्ष व खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ वरिष्ठ महाविद्यालय खडकी, पुणे यांचे बहि:शाल केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “पुणे शहर व पुणे ग्रामीण भागातील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष व सचिव चर्चासत्र”उत्साहात संपन्न झालेयाप्रसंगी व्यासपीठावर चर्चासत्राचे प्रमुख अतिथी-व्याख्याते म्हणून ज्येष्ठ मानद संचालक, बहि:शाल विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मा. डॉ. तेज निवळीकर, मानस संचालक मा. डॉ. हरिश्चंद्र नवले, मा.श्री. चंद्रकांत म. श्री महामुनी, मा. श्री अरुण रोडे, मा. डॉ. मिलिंद सरदार, मा‌. श्री. राजीव कुलकर्णी,मा.श्री. राजन दीक्षित व्यासपीठावर उपस्थित होते.चर्चासत्राच्या प्रस्ताविकेत खडकी शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या आपत्ती निवारण व्यवस्थापन याचे लिखित स्वरूपात दस्तऐवज-नोंद घेता यावी. तसेच संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्यासाठी राबविल्या जाणाऱ्या अनेकविध कल्पना, योजना, उपक्रमांना समाजात शाश्वत स्वरूप प्राप्त व्हावे; याकरिता या चर्चासत्राचे विद्यापीठ पातळीवर पहिला यशस्वी प्रयत्न होत आहे असे गौरवाने सांगितले.डॉ.तेज निवळीकर यांनी उद्घाटनपर व्याख्यानातून ज्येष्ठांच्या ज्ञान,अनुभव आणि परिपक्वतेचा गौरव करताना जे तरुणांकडे नाही ते ज्येष्ठांकडे असते यांच्याकडून ते स्वीकारले पाहिजे. याचा उपयोग समाजासाठी तरुणांनी केलाच पाहिजे. असे मत मांडताना त्यांनी व्यक्तिगत कुटुंब,समाज पातळीवरचे जीवन आणि चैतन्यमय जीवनाची रूपरेषा व्याख्यानातून उलगडताना वृद्धांचा-ज्येष्ठांचा सन्मान केला. समाजातली ज्येष्ठ व्यक्ती ही टाकाऊ नसते तर फिक्स डिपॉझिट असते. जे मी आयुष्यात शिकलो नाही ते आयुष्यभर ज्येष्ठांकडून शिकलो. असे गौरवद्गार याप्रसंगी त्यांनी काढले.चंद्रकांत महामुनी यांनी मोबाईलचा योग्य वापर काळाची गरज या विषयावर बोलताना नव्या गोष्टी शिकणे आणि आत्मसंकलित करणे यासाठी ज्येष्ठांनी मोबाईलचा वापर करावा ही काळाची गरज आहे कोरोना काळात याची प्रचिती आपल्याला निश्चित आली हे अनुभवातून त्यांनी ज्येष्ठांसमोर कथन केले. श्री अरुण माधव रोडे यांनी जेष्ठ नागरिक चळवळ यासंदर्भात बोलताना आज ज्येष्ठांची संख्या एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात ३७ टक्के असली तरीही पुढील काळात ती६८ टक्केपर्यंत नक्कीच पोहोचेल हे विज्ञान शास्त्राचे दाखले देऊन ज्येष्ठांच्या सुखसोयीपूर्ण आरोग्यामय आयुष्यासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी भागात असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांकरिता संघ उभे राहणे गरजेचे आहे हे सांगितले. डॉ. मिलिंद सरदार यांनी आरोग्यदायी सुखी जीवनाचा कानमंत्र सांगताना दैनंदिन रोजाच्या चुकीच्या जीवनशैलीचा आढावा घेतला. मीच माझ्या आनंदी सुखी जीवनाचा शिल्पकार यासाठी सतत सकारात्मक राहिल्यास सर्व आजार निघून जातात यासाठी सुरुवात कधीपासून आणि कुठपर्यंत…?याचे उत्तर शेवटपर्यंत… हा आरोग्यदायी कानमंत्र सांगितला. स्वतःचा अहंकार-इगोच संपूर्ण मेडिकल व्यवसाय चालवतो. इगो नष्ट करा रोग पळून जातात हे त्यांनी दिलखुलास शैलीतून व्यक्त केले. ज्येष्ठ नागरिकांकरिता हेल्पेज इंडियाचे सामाजिक आणि आरोग्यदायी कार्य सेवाभावी वृत्तीने कसे चालते हे राजीव कुलकर्णी यांनी सर्वांसमोर मांडले.
चर्चासत्राच्या शेवटच्या सत्रात महाराष्ट्रभरातून आलेल्या ग्रामीण आणि शहरी भागातील ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष,सचिव,सदस्यांनी खुल्या चर्चासत्रात आपापल्या ज्येष्ठ नागरिक संघात राबवल्या जाणाऱ्या विविध अभिनव उपक्रमांचा, भविष्यातील उपक्रमांचा थोडक्यात आढावा घेतला. चर्चासत्रातून व्यक्त झालेल्या विविध इच्छा,आकांक्षां,अपेक्षांना शासन माध्यमातून समाजापर्यंत पोहोचविण्याचा मानस सर्वांनी व्यक्त केला ‌.
चर्चासत्राच्या उत्कृष्ट नियोजनात खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.कृष्णकुमार गोयल, सचिव मा. आनंद छाजेड, सहसचिव तथा प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि सर्व पदाधिकारी यांनी मोलाचे योगदान दिले.
महाविद्यालयाचे कला शाखेचे उपप्राचार्य, प्रा. महादेव रोकडे, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सुचेता दळवी, संगणकशास्त्र शाखेचे उपप्राचार्य, प्रा. राजेंद्र लेले, आय.क्यू.ए.सी.च्या प्रमुख प्रा. गौरी माटेकर, ज्येष्ठ प्रा.जुगल नाईक,बहि:शाल शिक्षण मंडळाच्या समन्वयक प्रा. ज्योती वाघमारे, डॉ. अविनाश कोल्हे,प्रा. मयूर करणे, डॉ. दिपाली औसरमल,प्रा. कविता सिकंदर, डॉ. सोनाली गेडाम, डॉ. सुजाता भालेराव,प्रा. शुभम पटारे, डॉ. पद्माकर घुले,तंत्रज्ञ श्री.अमोल अमराव, श्री बाबासाहेब गायकवाड, सेवक श्री.अंगद कानडे, श्री.रमेश शेलार, श्री.पवन पवार, त्यांनी कार्य केले. ्विद्यार्थी राकेश परदेशी,कु.शकायनी रेड्डी,कु‌ कोमल स्वामी यांनी सूत्रसंवादन केले.प्रा. ज्योती वाघमारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.