पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन उत्साहात संपन्न.
खडकी : .दि:२६ (प्रतिनिधी):
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती महोत्सव
आज सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांचे वतीने खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या दत्ताजी गायकवाड सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे कार्यकर्तृत्व आणि सामाजिक योगदान यावर पोवाडा, नृत्य,नाट्य, संगीत असा रोमहर्षक कार्यक्रम सादर करण्यात आला. खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.कृष्णकुमार गोयल आणि प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खडकी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अनिल मेहता होते.प्रमुख पाहुणे म्हणून नेहरू युवा केंद्र भारत सरकार चे सांस्कृतिक युवा अधिकारी आशिष शेटे,महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे कार्यक्रमाधिकारी श्री.मच्छिंद्र पाटील,दिग्दर्शक श्री.वैभव महाडीक, कोरिओग्राफर व आयोजक श्री सागर रोकडे, सूत्रधार श्री.अमित घरत , खडकी शिक्षण संस्थेचे चिटणीस श्री आनंदजी छाजेड संस्था पदाधिकारी रमेश अवस्थे कार्यक्रम समन्वयक डॉ. अविनाश कोल्हे उपप्राचार्य डॉ. सुचिता दळवी उपप्राचार्य प्रा. महादेव रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
श्री. वैभव महाडिक यांनी
प्रास्ताविकेतून अहिल्यादेवी यांच्या कार्याचा परिचय करून दिला. संस्था चिटणीस आनंद छाजेड यांनी महाराष्ट्र शासनाचे आभार मानून अशा कार्यक्रमातून इतिहासाची उजळणी होते असे आपल्या मार्गदर्शन पर भाषणातून सांगितले. सूत्रसंचालन डॉ.अविनाश कोल्हे,आभार प्रदर्शन उपप्राचार्य प्रा.महादेव रोकडे यांनी मांनले.या सोहळ्याचे यशस्वी आयोजन वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य,डॉ.सुचेता दळवी, कलाशाखेचे उपप्राचार्य प्रा. महादेव रोकडे,डॉ.अविनाश कोल्हे,श्री.बाबासाहेब गायकवाड यांनी केले . महाविद्यालयाचा सर्व प्राध्यापकवृंद,कार्यालय कर्मचारी,आणि स्वयंसेवी विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
