सावित्रीबाई बाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल विभागांतर्गत बहि:शाल केंद्राने एकदिवसीय ज्येष्ठ नागरिक शिबीर

सावित्रीबाई बाई फुले पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल विभागांतर्गत आपल्या महाविद्यालयाच्या बहि:शाल केंद्राने एकदिवसीय ज्येष्ठ नागरिक शिबीर आपल्या बोपोडी ज्येष्ठ नागरिक संघ यांच्या सहकार्याने बोपोडी च्या वास्तुमध्ये दि. 11 फेब्रुवारी 2025 रोजी संपन्न झाले. सदर शिबिराचे उदघाट्न आपल्या खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. कृष्णकुमार गोयल सर व सचिव मा. आनंद छाजेड सर व आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे सर , ज्येष्ठ व्याख्याते डॉ. राजेंद्र कांकारिया व बोपोडीच्या ज्येष्ठ नागरिक संघांचे अध्यक्ष मा. ज्ञानेश्वर मुरकुटे व त्यांचे सहकारी यांच्या हस्ते संपन्न झाले. प्राचार्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, गोयलसरांनी अध्यक्षीय मनोगत मांडले.
सदर शिबिरास तोडीस तोड असे चार व्याख्याते लाभले ज्येष्ठ व्याख्याते डॉ. राजेंद्र कांकारिया यांनी व्याख्यानाचे पाहिले सत्र ‘ज्येष्ठाचे आरोग्य ‘ या विषयावर झाले त्यांनी उपस्थित ज्येष्ठान्ना खूप छान आरोग्यविषयक माहिती दिली. दुसरे सत्र मा. डॉ विजय काकडे सरांनी गझल गप्पा आणि गाणी या विषयावर घेतले, हे नुसते व्याख्यान न होता गोड आवाजात त्यांच्या स्व-रचित गझला त्यांनी सादर केल्या व त्यास उपस्थितांनी उत्तम साथ व दाद दिली. तिसरे सत्र हास्यसम्राट मा. मकरंद टिल्लू यांनी हास्याच्या प्रयोगात उपस्थितांना सामील करून ज्येष्ठाचे खुप छान मनोरंजन केले. चौथे सत्र मा डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी महाराष्ट्राच्या लोककला या विषयावर घेतले.
. मा. बाळकृष्ण लळीत सरांचे व्याख्यान खुप छान झाले श्रोत्यांनी व्याख्यानास टाळयांच्या गजरात दाद दिली. अशा पद्धतीने शिबिरातील चारही व्याख्याने अगदी सुरेख झाली व ज्येष्ठाची दाद मिळवून गेली.
शिबिराच्या समारोप समारंभास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक कक्षाचे मानद संचालक मा. डॉ. हरिष नवले सर व मा. प्राचार्य डॉ. संजय चाकणे तसेच मराठी विभाग प्रमुख मा. महादेव रोकडे,भूगोल विभाग प्रमुख डॉ.निलेश काळे, हिंदी विभाग प्रमुख डॉ. अविनाश कोल्हे, बाबा गायकवाड व इतर मान्यवर उपस्थित होते. बहि:शाल केंद्र समन्वयक प्रा ज्योती वाघमारे यांनी कार्यक्रमाचा थोडक्यात आढावा घेतला व उपस्थित ज्येष्ठाचे मनोगत झाले. मा. नवले सरांच्या हस्ते शिबिरार्थी ज्येष्ठान्ना उपस्थिती प्रमाणपत्र देण्यात आले.नवले सरांचे समारोपीय मनोगत मांडले नंतर प्राचार्यांचे मनोगत झाले. मा. प्रचार्यांनी महाविद्यालयाच्या बहि:शाल केंद्राच्या सर्व समिती सदस्यांचा सत्कार नवले सरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन केला.समारोपीय आभार प्रदर्शन मा.डॉ. अविनाश कोल्हे सरांनी केले.
शिबिराच्या समारोप समारंभास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि:शाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक कक्षाचे मानद संचालक मा. डॉ. हरिष नवले सर व मा. प्राचार्य डॉ. संजय चाकणे तसेच मराठी विभाग प्रमुख मा. महादेव रोकडे,भूगोल विभाग प्रमुख डॉ.निलेश काळे, हिंदी विभाग प्रमुख डॉ. अविनाश कोल्हे, विद्यार्थी विकास चे प्रा भागवत शिंदे, व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्व्यक प्रा. शुभम पठारे व इतर मान्यवर उपस्थित होते. बहि:शाल केंद्र समन्वयक प्रा. ज्योती वाघमारे यांनी कार्यक्रमाचा थोडक्यात आढावा घेतला व उपस्थित ज्येष्ठाचे मनोगत झाले. मा. नवले सरांच्या हस्ते शिबिरार्थी ज्येष्ठान्ना उपस्थिती प्रमाणपत्र देण्यात आले.नवले सरांचे समारोपीय मनोगत मांडले नंतर प्राचार्यांचे मनोगत झाले. मा. प्राचार्यांनी महाविद्यालयाच्या बहि:शाल केंद्राच्या सर्व समिती सदस्यांचा सत्कार नवले सरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन केला.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. राकेश परदेशीं व कु.रितेश वाघमारे यांनी केले,आभार प्रदर्शन मा.डॉ. अविनाश कोल्हे सरांनी केले.
सदर कार्यक्रमास मा. प्राचार्यांच्या व उपप्राचार्य व वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. सुचेता दळवी यांचे मार्गदर्शन लाभले. सदर एकदिवसीय शिबीर यशस्वी करण्यास ज्येष्ठ नागरिक संघ मा. मुरकुटे आण्णा व सर्व टीमचे, महाविद्यालयाच्या बहि:शाल सदस्य मा. डॉ. अविनाश कोल्हे, डॉ शैलेंद्र काळे, डॉ. पद्माकर घुले,डॉ. दिपाली आवसरमल, प्रा.स्नेहल उत्तेकर, डॉ. निलेश काळे,बाबा गायकवाड सर, प्रा. अर्चना तारू, प्रा. भागवत शिंदे, प्रा. शुभम पटारे, आपले OS डामसे सर व महाविद्यालयाचे प्रथम द्वितीय वर्षाचे विद्यार्थी या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.
उल्लेखनीय बाब म्हणजे संपूर्ण महाविद्यालयातील प्रत्येक विभागाचा सहभाग या शिबिरास प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे होता त्यामुळेच हे शिबीर यशस्वीपणे संपन्न झाले. 🙏🙏
विशेष उल्लेखनीय बाबी –
1.व्याख्याते मा. डॉ.कांकारिया सर हे आपल्या प्राचार्यांचे शिक्षक, डॉ. काकडे सर हे प्रा. अर्चना तारू यांचे शिक्षक व डॉ. लळीत सर हे सन 1989 ते 1991 पर्यंत आपल्या महाविद्यालयामध्ये शिक्षक होते, त्यांची शिक्षकीपेशाला सुरवात आपल्या खडकी शिक्षण संस्थेतून झाली हे विशेष.
2.प्राचार्यांनी बोपोडीच्या ज्येष्ठ नागरिकांना अवांतर वाचनासाठी 500 ग्रंथ बदलत्या क्रमाने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. सदर ग्रंथ ठेवण्यासाठी लागणाऱ्या कपाटाची उपलब्धता करून देण्याचे आश्वासन आपल्या संस्थेचे अध्यक्ष मा. गोयल सरांनी केले, तसेच मा.गोयल सरांनी बोपोडी संघाच्या ज्येष्ठान्ना देण्यासाठी ड्रायफ्रूटस आणले होते.

प्रा. ज्योती वाघमारे
बहि:शाल समन्वयक

Scroll to Top