महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की आपल्या महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन 2024 ‘टि जे चं चांगभलं ‘ या नावाने लवकरच म्हणजे 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये होणार आहे यामध्ये 26 जानेवारीला या ‘टि जे चं चांगभलं’ या सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन होईल त्यानंतर 27 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांनीच सुचवलेले आणि विद्यार्थ्यांनीच सर्व प्रकारे नियोजित केलेले कार्यक्रम पुढे दिलेल्या वेळापत्रक प्रमाणे असतील. त्यानंतर एक तारखेला पुरस्कार वितरण सोहळा असेल तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. सर्व सहभागींना प्रमाणपत्र त्याचप्रमाणे दोन क्रेडिट मिळणार आहेत. नावनोंदणी सुरू झाली आहे.नावनोंदणीसाठी संबधीत विभागात भेट द्या.
(नावनोंदणीसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क नाही परंतु अंतिम तारीख मात्र असेल तेव्हा वेळ न घालवता त्वरीत संपर्क करा)
डॉ सुचेता दळवी
स्नेहसंमेलन प्रमुख
डॉ संजय चाकणे
प्राचार्य