Blood Donation Camp

तरुणांनी रक्तदान करण्याची आवश्यकता आहे —
डॉ. संजय चाकणे

खडकी शिक्षण संस्था टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडकी, पुणे. राष्ट्रीय सेवा योजना विभाग व सांगवी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नवी सांगवी , पुणे च्या वतीने आयोजित
महाविद्यालयातील विद्यार्थी व राष्ट्रीय सेवा योजना विभाग स्वयंसेवक यांच्यासाठी रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान याप्रमाणे भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले होते, रक्तदान शिबिराचे उद्घाटन खडकी शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयाचे स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी यावेळी रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान याप्रमाणे यावेळी अनेकांनी रक्तदान केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे, अभिनंदन व कौतुक केले सामाजिक बांधिलकी जपत महाविद्यालयातील तरुण रक्तदान करण्यासाठी पुढे येत होते याचे कौतुक केले यावेळी त्यांनी तरुणांनी अशाच समाज उपयोगी उपक्रमात आपले योगदान देणे आवश्यक आहे असे मत व्यक्त केले. तसेच कार्यक्रम संयोजक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभाग च्या वतीने कार्यक्रमाधिकारी डॉ. निलेश काळे यांनी केले होते. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी एचबी टेस्टिंग, वजन, तसेच ब्लड ग्रुप अशा पद्धतीने सर्वांचे चेकिंग करण्यात आले. उपक्रमाच्या ठिकाणी महाविद्यालयाच्या उप प्राचार्य डॉ.सुचेता दळवी, उपप्राचार्य तथा आय. क्यू.ए. सी. समन्वयक प्रा. राजेंद्र लेले, प्रा.महादेव रोकडे, प्रा. शरदचंद्र बोटेकर,कार्यालयीन अधीक्षक श्री.लक्ष्मण डामसे, तसेच महाविद्यालयाचे अनेक प्राध्यापक व कार्यालयाचे कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

Scroll to Top