दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी, प्रादेशिक मनोरुग्णालय येरवडा येथे मानसशास्त्र विषयाचे (पदवी ) वर्षातील विद्यार्थी यांनी अभ्यास सहलीत सहभाग घेऊन. मानसिक आरोग्य आणि विविध प्रकारच्या मनोविकृती वरील उपचार आणि उपाययोजना यांची माहिती घेतली. मानसोपचार आणि त्यामधील व्यावसायिक संधी याची माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. दैनंदिन जीवनामध्ये येणाऱ्या समस्या, ताणतणावाचे विस्थापन, भावना आणि प्रेरणा यातील संघर्ष, व्यक्तिमत्वाचे सादरीकरण आणि प्रकटीकरण, त्याचबरोबर वर्तनातील आपले विचार आणि निर्णय क्षमता यामध्ये होणारे परिणाम हे सर्व विद्यार्थ्यांना अभ्यासण्यास मिळाले. कुटुंबातील किंवा आपल्या परिवेशातील मानसिक समस्यांना कसे सामोरे जावे आणि त्याबद्दलच्या उपाययोजना कशा अमलात आणाव्यात याबद्दलही विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला. मानसशास्त्रातील व्यावसायिक संधी याबद्दलही विद्यार्थ्यांना माहिती मिळाली. मानसोपचार तज्ञ डॉ. संदीप महामुनी आणि व्यावसायिक सामाजिक कार्यकर्ता व्यवस्थापक श्री. संजय जाधव यांनी प्रादेशिक मनोरुग्णालयातील परिसरातील सर्व विभाग यांची माहिती दिली. टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय वतीने डॉ.नागेंद्र जंगम यांनी मनोगत व्यक्त केले. कुमारी चेतना गालींदे हिने आभार मानले. आदरणीय प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनामुळे हे अभ्यास कार्यशाळा यशस्वी होऊ शकली. उप प्राचार्य श्री अर्जुन मुसमाडे,कार्यालयीन पर्यवेक्षक श्री. डामसे सर आणि सौ. चैत्राली जोशी यांनीही मोलाची मदत केली त्यासाठी त्यांचे मनःपूर्वक आभार.
डॉ. नागेंद्र जंगम
( मानसशास्त्र विभाग प्रमुख)