Foundation Course on “Fostering personal Development and Social Progress”

आज दिनांक 03/02/2025 रोजी टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय आणि बहाई अकॅडमी पाचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने foundation course on “Fostering personal Development and Social Progress” या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मान्यताप्राप्त Value added course चा Orientation Program महाविद्यालयाच्या नवीन सभागृहामध्ये पार पडला.या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बहाई अकॅडमी चे संचालक डॉ. लेसन आझादी सर आणि समन्वयक प्रा.सायली दुभाष मॅम उपस्थित होते. सुरवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ. सुचेता दळवी यांनी केले.त्यांनी आपल्या प्रास्तविकामध्ये विद्यार्थ्यांना पदवी शिक्षण घेत असताना अतिरिक्त क्रेडिट कसे मिळवायचे आणि ते का महत्वाचे आहे याबद्दल मार्गदर्शन केले.तदनंतर बहाई अकॅडमी तर्फे प्रा.सायली दुभाष यांनी विद्यार्थ्यांना या कोर्स बद्दल आणि त्याच्या मूल्यांकन पद्धती संबंधी सखोल मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी काही शिक्षणपुरक ॲक्टिव्हिटी घेतल्या व त्याचा काय परिणाम होऊ शकतो याचे महत्व पटवून दिले.त्यानंतर डॉ.लेसन आझादी यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधत या कोर्सचे महत्व त्यांना पटवुन दिले. एकूणच पदवी शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांकडून मानवी मूल्यांची जपवणूक कशी होईल आणि यातून ऐकून समाजाचे हित कसे साधले जाईल हा या कोर्स चा उद्देश आहे असे मत त्यांनी मांडले. विद्यार्थ्यांनीही डॉ. लेसन आझादी सरांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
प्राचार्य डॉ.संजय चाकणे सर यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदी विभागप्रमुख डॉ.अविनाश कोल्हे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.मयूर कढणे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपप्राचार्य डॉ.सुचेता दळवी,अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा. जुगल नाईक, मराठी विभागप्रमुख प्रा.महादेव रोकडे हिंदी विभागप्रमुख डॉ.अविनाश कोल्हे,प्रा.भागवत शिंदे,प्रा.शुभम पटारे,प्रा.कांचन पाटील, मानसशास्त्र विभागप्रमुख डॉ.नागेंद्र जंगम,डॉ.पद्माकर घुले,भूगोल विभागप्रमुख डॉ.निलेश काळे, कार्यालय अधीक्षक श्री.लक्ष्मण डामसे तसेच सेवक सर्व श्री.आशिष ,पवन,गणेश,वैभव,अंगद कानडे आणि Fy.B.Com मधील विद्यार्थी स्वयंसेवक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.या सर्वांचे मनापासून हार्दिक आभार.

-प्रा.मयूर प्रदीप कढणे
(ॲड ऑन कोर्स समन्वयक)

Scroll to Top