Psychological testing & Hypnotism therapy Workshop

टीकाराम जगन्नाथ महाविद्यालय, मानसशास्त्र विभागातर्फे,
एक दिवसीय व्याख्यानमाला कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण… 1)मानसशास्त्रीय मापन चाचण्या यांचे उपयोजन, डॉ.संतोष जानराव यांनी मानसशास्त्रीय सर्व प्रकारच्या चाचण्या याची माहिती आणि प्रात्यक्षिका द्वारे
दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला सर्व क्षेत्रांमध्ये मानसशास्त्रीय चाचण्यांचे वापर आणि उपयोजन कसे करता येईल, याबद्दल सविस्तर माहिती दिली. सर्व प्रकारच्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये आणि शैक्षणिक व व्यक्तिमत्व विकासामध्ये मानसशास्त्रीय चाचण्यांचा कसा वापर करता येतो. हे पटवून दिले. काही प्रकारच्या चाचण्यांचे प्रात्यक्षिकही करून दाखवले.
2) मानसशास्त्र आणि संमोहन उपचार, श्री. ज्ञानेश्वर काटे हे भारतातील प्रसिद्ध संमोहन तज्ञ असून, त्यांनी संमोहनशास्त्र आणि मानसशास्त्र यांचा समवाय सांगून, प्रात्यक्षिकाद्वारे दैनंदिन जीवनामध्ये संमोहन शास्त्र हे समस्या निराकरणासाठी कशाप्रकारे काम करते याची माहिती दिली. प्रात्यक्षिकामधून
मानसशास्त्रीय दृष्ट्या जीवन जगण्याचे सकारात्मक उपयोजन समजावून सांगितले.कार्यक्रमाचे निवेदन कुमारी चेतना, प्रास्ताविक मेजमीन व्यापारी यांनी केले.
प्रा. ज्योती वाघमारे,
डॉ. अविनाश कोल्हे,
डॉ. शितल रणधीर,
कला शाखेचे उपप्राचार्य,
प्रा. महादेव रोकडे हे कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते. आदरणीय प्राचार्य
डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.
सर्वांचे आभार डॉ. नागेंद्र जंगम
मानसशास्त्र विभाग प्रमुख
यांनी व्यक्त केले..