आज दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोजी आपल्या टिकाराम जगन्नाथ कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयामध्ये Rational Thinking Cell व IQAC च्या मार्फत विज्ञानवादी दृष्टिकोन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.सदर कार्यक्रमासाठी डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीमध्ये स्थापनेपासून सक्रिय सहभागी असलेले श्री.मिलिंद विनायक देशमुख यांना प्रमुख व्याख्याते म्हणून निमंत्रित करण्यात आले होते.त्यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानवादी दृष्टिकोनाचे महत्व तसेच अंधश्रध्देच्या आहारी गेल्याने होणारे नुकसान याविषयी सखोल मार्गदर्शन केले.तसेच काही प्रात्यक्षिके दाखवून कशाप्रकारे लोक काहीही विचार न करता एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतात याविषयी माहिती दिली.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय चाकणे आणि IQAC समन्वयक प्रा.राजेंद्र लेले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन प्रा.अर्चना तारू यांनी केले.सदर कार्यक्रमासाठी एकूण 52 विद्यार्थी उपस्थित होते. तसेच प्रा.गौरी माटेकर,प्रा.ऐश्वर्या कराळे,डॉ.दीपाली खोडदे,प्रा.मयूर कढणे आदी प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अर्चना तारू यांनी केले. प्रा.कढणे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय व प्रा.ऐश्वर्या कराळे यांनी आभार मानले.