किर्लोस्कर वसुंधरा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल 2024- 25 आयोजित ग्रीन कॉलेज क्लीन कॉलेज सुपर फिनाले ही स्पर्धा 4 मार्च रोजी संपन्न झाली या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्र बाहेरील विविध 150 शहरांमधील महाविद्यालयांनी आपला सहभाग नोंदवला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभदि 5 मार्च रोजी पीवायसी हिंदू जिमखाना येथे संपन्न झाला यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी व डॉक्टर मोहन आगाशे ,आर आर देशपांडे (चेअरमन के व्ही आय एफ एफ), वीरेंद्र चित्राव आदी मान्यवर उपस्थित होते .
पुणे व पिंपरी चिंचवड शहरांतर्गत महाविद्यालयांनी केलेल्या सादरीकरणांमध्ये आपल्या महाविद्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला तसेच सुपर फिनाले स्पर्धेमध्ये विविध राज्यातील महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता त्यामध्ये आपल्या महाविद्यालयाला उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. या स्पर्धेसाठी आपल्या महाविद्यालयातील तृतीय वर्ष संगणक वर्गातील प्रेम जगदाळे व प्रथम वर्ष संगणक वर्गातील रूथ गायकवाड या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी सादरीकरण केले. प्रा. शुभांगी पाटील (समन्वयक पर्यावरण जागृती) व प्रा. प्रियांका बनकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या उपक्रमासाठी अध्यक्ष कृष्णकुमार गोयल सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे सर व उपप्राचार्य प्रा. राजेंद्र लेले यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन अनमोलआहे.


