दिनांक 2 ऑक्टोबर 2023 रोजी महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त विशेष श्रमदान करताना शिक्षकेतर कर्मचारी प्राध्यापक व राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी

खडकी शिक्षण संस्था टिकाराम जगन्नाथ कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडकी, पुणे
महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मा. क्षेत्रीय संचालक, भारत सरकार युवा व खेल मंत्रालय भारत, पुणे यांच्या सूचनेनुसार स्वच्छता ही सेवा या मोहिमेनुसार तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या परिपत्रकानुसार तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 2 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता, महात्मा गांधी जयंती निमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांचे हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून महाविद्यालयात एक तास स्वच्छता अभियान राबविण्यात आले.या वेळी जिमखाना, महाविद्यालय परिसर स्वच्छता करण्यात आला.
सदर उपक्रमात महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश काळे, विदयार्थी विकास अधिकारी प्रा. स्वामीराज भिसे, ग्रंथपाल आनंद नाईक, श्री.बाबा गायकवाड, श्रीमती अनिता जाधव, सौ.मनीषा शिंदे, वृषाली तावरे, श्री.विजय दुदुसकर, श्री.माऊली गायकवाड,श्री.सुरेश सोलंकी, श्री.इंगवले, श्री.आशिष, श्री.चेट्टीयार तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक सहभागी झाले.

Scroll to Top