“भारत-भारती” भव्य राष्ट्रीय एकात्मता शोभा यात्रा

दिनांक रविवार,२८ जानेवारी २०२४
स्थळ : सर परशुराम भाऊ महाविद्यालय मैदान, पुणे.
भारत भारती: राष्ट्रीय एकात्मतेला समर्पित
“भव्य राष्ट्रीय एकात्मता शोभायात्रा”
….”भारत माँ का एक ही नारा!
एकत्रित हो परिवार हमारा!!
अशा राष्ट्रीय एकात्मतेच्या जाज्वल्यमय मंगलमय भावनेने आणि सर्वसामावेशक देशाभिमानाच्या घोषणनेतून “भारत-भारती” भव्य राष्ट्रीय एकात्मता शोभा यात्रेला प्रारंभ झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या ३५०व्या राज्याभिषेक मंगल दिवसाच्या प्रित्यर्थ ; २२ जानेवारीस झालेल्या आयोध्या मधील भव्य श्रीराम मंदिराच्या उद्घाटन प्रसंगी आणि सध्या चालू असलेल्या स्वतंत्र भारताच्या अमृत काल महोत्सवाच्या निमित्ताने आनंदाने भारत भरतीचे पुणे शहरातून, उस्फूर्त सहभागातून हजारोच्या संख्येने शोभायात्रा झाली.

या शोभायात्रेमधील ३५० व्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापना ३५० व्या राज्याभिषेक प्रित्यर्थ आपल्या खडकी शिक्षण संस्थेच्या, टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची “सावळ्या तांडेल” ही (जिवंत सादरीकरणाची)थीम होती. या जिवंत देखाव्याद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावान मावळे महाराजांनी दिलेली आज्ञा अथवा महाराजांनी घालून दिलेले नियम हे किती तंतोतंत पाळत होते आणि स्वतः महाराज जरी समोर उभे असले तरी सुद्धा त्या नियमांमध्ये किंचित सुद्धा बदल ते करत नव्हते स्वराज्य प्रति आणि महाराजांच्या नियमानप्रती मावळ्यांची असलेली ही निष्ठा या प्रसंग द्वारे आम्ही दाखवून दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या कल्पनेतून महाविद्यालयातील सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा.स्वामीराज भिसे यांच्या मार्गदर्शनातून महाविद्यालयातील सांस्कृतिक कला विभागातील एस वाय, टी वाय च्या कलावंत विद्यार्थ्यांनी शोभायात्रा रथामध्ये जिवंत देखावा सादर केला. रथातील ऐतिहासिक क्षणांची सजावट प्रा. अविनाश कोल्हे, डॉ.तेजस्विनी शेंडे, डॉ.निलेश काळे, डॉ. दिपाली खोडदे, डॉ. पद्माकर घुले, प्रा. शुभम पटारे, ग्रंथपाल आनंद नाईक,प्रा. वृषाली तावरे, श्री बाबा गायकवाड, प्रा कविता चव्हाण, प्रा सुजाता भालेराव यांनी केली. प्राचार्य डॉ. संजय चाकणे, उपप्राचार्य प्रा. शरदचंद्र बोटेकर, प्रा.महादेव रोकडे, यांनी सहभाग घेतला.
या भव्य शोभायात्रेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या साडेतीनशे व्या राज्याभिषेक सोहळा, राम मंदिरावरील प्रसंग,महाराष्ट्र,गुजरात,राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार,झारखंड,उडिसा,बंगाल, आसाम, उत्तराखंड,पंजाब, मणिपूर, कर्नाटक, आंध्रा-तेलंगणा, तामिळनाडू, केरळ इत्यादी प्रदेशातील शिक्षण संस्था, धार्मिक संस्था, सेवाभावी संस्था यांनी सहभाग घेतला.
पुणे शहरातील एमआयटी, सिम्बायोसिस, डी वाय पाटील, स.प. मंडळी, मॉडर्न एज्युकेशन सोसायटी, डेक्कन सोसायटी, लोकसेवा सैनिक स्कूल, ऑफिसर्स करियर अकॅडमी, फुलगाव मिलिटरी स्कूल, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, एच.व्ही. देसाई कॉलेज, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी आणि खडकी शिक्षण संस्थेचे तुकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय अशा विविध मानांकित शिक्षण संस्थांनी सहभाग घेतला.
पुणे शहरात असलेल्या अनेक सेवाभावी राष्ट्रीय स्तरावरील धार्मिक संस्थांच्या भारत भारती शोभायात्रे सहभाग नोंदविला.यात, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, रामकिशन मिशन, इस्कॉन, जैन समाज, सिंधी समाज, बौद्ध समाज,आर्य समाज, गायत्री परिवार,प्रजापिता ब्रह्मकुमारी,आर्ट ऑफ लिविंग, पतंजली योगपीठ, आई माता मंदिर, सालासर बालाजी मंदिर, काकू शाम मंदिर ,राजचंद्र मिशन, अग्रवाल समाज, स्वामीनारायण मंदिर, गीता धर्म मंडळ यांचा सहभाग होता.यात्रेच्या मार्गावर या सर्व धार्मिक संस्थानांच्या उपसकांच्या सहभागातून मंगलमय,प्रसन्न वातावरण तयार झाले.
“भारतवासी पुणे निवासी… पुणे महानगर गागर में सागर…” आशा संदेशातून पहिल्यांदा हजारोच्या संख्येने एकत्रित आलेल्या जनसमुदायाने भारत-भारती शोभायात्रा सफल केली. राष्ट्रीय एकात्मतेच्या समर्पित भावनेने ‘भारत भारती- एकात्मता शोभायात्रे”चे आयोजन नियोजन आणि संयोजन भारत भारतीय परिवारातील राष्ट्रीय अध्यक्ष श्री.विनय पत्राळे, संयोजक,ज्येष्ठ ॲड.श्री. एस. के. जैन, राष्ट्रीय सचिव श्री .रुद्रनारायण तिवारी, भारत भारती चे महाराष्ट्र अध्यक्ष आणि आपल्या खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष,ज्येष्ठ उद्योजक, श्री. कृष्णकुमार गोयल, महाराष्ट्र सचिव श्री धर्मेंद्र सिंह, महाराष्ट्र उपाध्यक्ष श्री श्रीनिवास कुंटुल. पुणे शहराध्यक्ष श्री अचलजी जैन, पुणे सचिव श्री किरण भाटिया, पुणे शहर उपाध्यक्ष श्री सूर्यकांत पाठक. त्यांच्यासोबत संपूर्ण भारत-भारती परिवार उत्साहाने सहभागी होता.

भारत भारती रॅली समन्वयक
डॉ.निलेश काळे

प्राचार्य
डॉ.संजय चाकणे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top