Program Outcome
M.A.(Marathi)
PO-1 | पदव्युत्तर पातळीवरील विद्यार्थ्यांच्या वाङ्मयीन आणि जीवनविषयक जाणीवा समृद्ध होतील. |
PO-2 | साहित्यकृतीच्या चिकित्सक अभ्यासाची प्रवृत्ती वृद्धिंगत होईल. |
PO-3 | भाषिक जाणिवा विकसित करून कौशल्यात्मक उपयोजनासाठी सिद्ध होतील. |
PO-4 | विविध जीवनक्षेत्रातील भाषाविषयक कौशल्य ग्रहणानंतर रोजगारक्षमतांची आणि प्राविण्यांची निर्मिती होईल. |
PO-5 | विशिष्ट कालखंडातील साहित्यनिर्मितीच्या प्रेरणा व प्रवृत्ती लक्षात घेऊन साहित्याचे नेमके आकलन करून घेता येईल. |
PO-6 | तौलनिक अभ्यास, भाषांतर मीमांसा, प्रभाव अभ्यास, आंतरविद्याशाखीय दृष्टी, परभाषेतील समकालीन साहित्यकृती, वाङ्मयेतिहास, संस्कृती अभ्यास, भाषिक अभ्यास याद्वारे साहित्याच्या अभ्यासाला परिपूर्णता आणता येईल. |
PO-7 | पौर्वात्य व पाश्चात्य साहित्यविचार, साहित्यसिद्धांत, समीक्षा, साहित्यविमर्श, विविध वाङ्मयीन संप्रदाय, वेळोवेळी उद्भवणाच्या जीवनविषयक व वाङ्मयीन चर्चा, संकल्पना यांचा पैस विद्यार्थ्यांना परिचित होईल. |
PO-8 | संशोधनाची निरनिराळी अंगे तसेच विविध पद्धतींचा अभ्यास करता येईल. |