सलग दुसऱ्या वर्षी खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे पाबळ विज्ञान आश्रमात यशस्वी प्रशिक्षण पूर्ण.

दि.०८गुरुवार,२०२४,पुणे.
भारताला समृद्ध आणि उर्वरित जगासाठी मार्गदर्शक बनू इच्छितो. हे तेव्हाच घडेल जेव्हा प्रत्येकजण स्वत:च्या पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचू शकेल.”ह्या ध्येय-ध्यासाने कार्य करणाऱ्या पाबळ विज्ञानआश्रम,तालुका शिरूर, जिल्हा पुणे. येथे टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, खडकी,पुणे,०३. येथील सुमारे ३० विद्यार्थिनींनी दिनांक ०५ ते ०८ ऑगस्ट २०२४या कालावधीत सलग दुसऱ्या वर्षी यशस्वी निवासी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणाचे समन्वयक प्रा नमिता कुलकर्णी आणि डॉ तेजस्विनी शेंडे यांनी माहिती दिली.
पाबळ विज्ञान आश्रम ग्रामीण तंत्रज्ञानाच्या जगात कार्य करीत आहे. जेथे व्यक्ती उद्योजक बनण्याची त्यांची आवड व्यक्त करतात. त्यांना तांत्रिक कौशल्यासह कौशल्य प्रदान करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते.जे लोक गोष्टी वेगळ्या पद्धतीने पाहतात आणि मानवी कल्याणासाठी त्यांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांच्याकडे धाडस करण्याची क्षमता आहे त्यांच्यासाठी विज्ञान आश्रम खुले आहे. लिंग, शिक्षण, वय, फक्त संख्या आहेत अडथळे नाहीत. बदल सुरू करण्यासाठी आमच्यात सामील व्हा…”असे प्रशिक्षण समारोप प्रसंगी विज्ञान आश्रमाचे संचालक डॉ. योगेश कुलकर्णी,डॉ. सुभाष लबडे सहाय्यक प्रा. दिपाली कांबळे यांनी शिबिरार्थी विद्यार्थिनींना पुनश्च आवाहन केले.
खडकी शिक्षण संस्थेचे सहसचिव, प्राचार्य डॉ.संजय चाकणे यांनी विद्यार्थिनींना विज्ञान आश्रमातील नाविन्यपूर्ण नवप्रयोगाशील वैज्ञानिक प्रशिक्षण प्रत्यक्षात व्यवहारात आणि आपल्या सामाजिक सामाजिक जीवनात जाणिवेत सतत कृतिशील ठेवले पाहिजे. असा संदेश दिला.

1 thought on “सलग दुसऱ्या वर्षी खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे पाबळ विज्ञान आश्रमात यशस्वी प्रशिक्षण पूर्ण.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top