भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित “75 व्या संविधान दिनानिमित्त” आज दिनांक 26 नोव्हेंबर 2024 रोजी महाविद्यालयात तसेच खडकी भागातील वार्ड क्रमांक एक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व संविधानाच्या पुस्तकाचे पूजन करून राज्यघटनेची उद्देशिका याचे वाचन सामूहिकरीत्या करण्यात आले याप्रसंगी खडकीशी शिक्षण संस्थेतील टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यकारी अधिकारी डॉ.निलेश काळे प्रा. अर्चना तारू, प्रा.शुभांगी पाटील, प्रा.मारिया घडीयाली, ग्रंथपाल आनंद नाईक, अमोल आमराव तसेच स्थानिक मा. रिकेश यांना पिल्ले यांच्या नेतृत्वात आज हा कार्यक्रम आयोजित केलेला होता याप्रसंगी महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी व वसाहतीतील नागरिक उपस्थित होते.
त्याप्रसंगी विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधान दिन यांच्या घोषणा देण्यात आल्या.



