24 – 28 March 2025
Advanced Makeathon Vidyan Ashram Pabal Camp :
Our students learning Solid work and inscape software. project designing on computer then students learning operating Maker Fab Router machine through computer.
Learning while doing project pedagogy.
Project base learning.
विज्ञान आश्रम मध्ये रोज सकाळी प्रार्थना – योगा – नाष्टा – अभ्यास – जेवण – पुन्हा अभ्यास – एक तास रेस्ट – ऍक्टिव्हिटीज – मेडिटेशन – रात्रीचे जेवण आणि गेस्ट होस्टेलमध्ये झोपणे असा एकंदरीत सर्व विद्यार्थिनींचा दिनक्रम असे.
विज्ञान आश्रम मध्ये विविध प्रकारचे कोर्स ही चालतात हे सर्व कोर्स प्रॅक्टिकल बेस आहेत. तसेच गरजू विद्यार्थिनींना विद्यार्थी येथे प्रशिक्षण दिले जाते.
Innovative ideas ला खऱ्या अर्थाने येथे incubate केले जाते.
कोणतीच आयडिया येथे शक्यतो खाली जात नाही त्याला सायन्सची जोड देऊन ते पूर्णत्वास येते. आपल्या कॉलेजच्या विद्यार्थिनींनीही त्यांच्या साध्या आयडियाजला सायन्सचे जोड देऊन प्रत्यक्षातले प्रोजेक्ट केले आहे.
Glass memonto स्वतः डिझाईन करून fab Maker machine द्वारे कटिंग करून बनवले आहे.
दुसऱ्या प्रोजेक्टमध्ये सॉफ्टवेअरमध्ये खुर्ची डिझाईन करून फक्त कॉम्प्युटरने कमांड देणे आणि फेब मशीन ऑटोमॅटिक प्लायवुड कटिंग करून त्याचे सर्व भाग तयार करते आणि आपण फक्त त्याला असेंबल करायचे. कुठलेही कटर, हत्यारे आपल्या हातात घेण्याची गरज नाही. शेवटी दोन्ही प्रोजेक्टचे पीपीटी प्रेझेंटेशन झाले. या कॅम्पमध्ये इतर चार महाविद्यालयातलेही विद्यार्थीनी होते.
अशाप्रकारे विविध प्रकारचे डिझाईन कॉम्प्युटर मध्ये बनवता येते. हे आपल्या विद्यार्थ्यांना शिकता आले.
आदरणीय प्राचार्य डॉ. संजय चाकणे सरांच्या मार्गदर्शना खाली उपप्राचार्य प्रो रोकडे सर, डॉ दळवी मॅडम ,प्रो नाईक सरांच्या मदतीने संशोधन विज्ञान आश्रम पाबळ कॅम्प यशस्वी झाले. पाच दिवस राहण्याची संधी मला महाविद्यालयाने दिली. अर्थातच खडकी शिक्षण संस्थेशिवाय हे शक्य नव्हते. तसेच विज्ञान आश्रम पाबळचे डॉ. कुलकर्णी सर आणि त्यांची सर्व टीमने आपणास प्रशिक्षण दिले आणि काळजी घेतली त्यांचेही मनापासून धन्यवाद.
डॉ. तेजस्विनी शेंडे डोळस
प्रा. नमिता कुलकर्णी
समन्वयक
डॉक्टर संजय चाकणे
प्राचार्य



