Day 4…! (Competitions)

कार्यक्रम : गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, शेला पागोटे स्पर्धा आणि एकांकिका स्पर्धा

दिनांक : ६ फेब्रुवारी,२०२६ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाअंतर्गत “टी.जे.चं. चांगभलं” या सांस्कृतिक उपक्रमानुसार चौथ्या दिवशी वाणिज्य विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक व कौशल्याधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. गौरी माटेकर , प्रा.दिशा वांबुरकर ,सांस्कृतिक विभाग प्रमुख व उपप्राचार्य प्रा. महादेव रोकडे, उपप्राचार्या प्रा.डॉ. सुचेता दळवी यांच्या शुभहस्ते झाले.

वाणिज्य विभागाने गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, शेला पागोटे स्पर्धा आणि एकांकिका स्पर्धा यांचे प्रभावी आयोजन केले.
गायन स्पर्धा, नृत्य स्पर्धा, शेला पागोटे स्पर्धा आणि एकांकिका स्पर्धा या स्पर्धेमध्ये एकूण 8९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. सारिका मुंदडा, प्रा. अमृता खेंदाड आणि प्रा. सोनाली गेडाम यांनी केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाणिज्य विभागातील द्वितीय वर्षातील विद्यार्थीनी कु. ग्लोरी डॅनियल हिने केले आणि व्यवस्थापन वाणिज्य विभागातील विद्यार्थी अमोल निविलकर,आनंद शितोळे, ओम मुत्तेल्लु , सूरज अवताडे, श्री बनसोडे, आयुष पगारे, शंकर गुजराल, श्रुती गायकवाड, शकायना रेड्डी, व्हिक्टोरिया जोसेफ, मानसी सोनवणे या स्वयंसेवकांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले.

यावेळी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास आणि सांस्कृतिक जाणीव वाढीस लागली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाणिज्य विभागातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी स्वयंसेवक व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

नृत्य स्पर्धा

Comments (0)

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top