DAY 5…! (Bollywood Day)

“टी.जे.चं. चांगभलं” – पाचवा दिवस

कार्यक्रम :
१.बॉलिवूड स्पर्धा
२.मेहंदी स्पर्धा
३. फन फेअर स्पर्धा

दिनांक : ७ फेब्रुवारी,२०२६

महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाअंतर्गत “टी.जे.चं. चांगभलं” या सांस्कृतिक उपक्रमानुसार पाचव्या दिवशी कम्प्युटर एप्लिकेशन्स विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कला-गुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक व कौशल्याधारित स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसंगी परीक्षा विभाग प्रमुख प्रा. मुपाडे(प्रमुख पाहुणे ),आय.क्यू.ए.सी. समन्वयक प्रा. गौरी माटेकर ,उपप्राचार्य व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. महादेव रोकडे, उपप्राचार्या प्रा.डॉ. सुचेता दळवी , प्रा. जुगल नाईक , प्रा. डॉ.शीतल रणधीर यांच्या शुभहस्ते झाले.

बॉलिवूड स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, फन फेअर स्पर्धा यांचे प्रभावी आयोजन केले. या स्पर्धांमध्ये एकूण 198 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ.तेजस्विनी शेंडे, प्रा. ज्योती वाघमारे , प्रा.डॉ.शीतल रणधीर, प्रा.मयुरी थेटे आणि प्रा. शुभांगी पाटील, प्रा. डॉ.रुपाली निजामपूरकर , प्रा. आरती चोळेकर यांनी केले.

संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागातील द्वितीय व तृतीय वर्षातील विद्यार्थीनी कु. भक्ती केंगर व कु. पायल पात्रे ह्यांनी केले आणि व्यवस्थापन साबीर शाह , सोहम मोरे, यश धीरे, प्रभुदेवा , आशिष जगदेव , काब पीरजादे, अमीना शाह या स्वयंसेवकांनी अत्यंत प्रभावीपणे पार पाडले.

यावेळी महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रम यशस्वी केला. या स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, आत्मविश्वास, संघभावना व नेतृत्व गुण विकसित करणे हा मोठा उद्देश होता आणि या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना त्यांची सर्जनशीलता आणि कौशल्ये सादर करण्याची संधी मिळाली व त्यांची सांस्कृतिक जाणीव वाढीस लागली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कम्प्युटर एप्लिकेशन्स विभागातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी स्वयंसेवक व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

मेंदी  स्पर्धा

Bollywood Day

फन फेअर

Comments (0)

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top