B.A. (Marathi)

मराठी विभाग

मराठी विभाग माहिती:

महाविद्यालयामध्ये मराठी विभागाची स्थापना १९८३ साली झाली. महाविद्यालयामध्ये १९८३ पासून पदवी स्तरावर मराठी विषय शिकवला जात आहे. १९९२ पासून मराठी विषयास विशेष स्तरावर मान्यता मिळालेली आहे. मराठी विभागात अध्ययन अध्यापनाबरोबरच मराठी भाषेच्या संवर्धनासाठी अनेक विविध उपक्रम राबवले जातात. मुख्यत्वे विद्यार्थ्यांना लेखन वाचन आणि संभाषण कौशल्य शिकवण्यावर भर दिला जातो.

उद्देश :

१. मराठी भाषा आणि साहित्य परिचय करून देणे.

२. साहित्याच्या अभ्यासाद्वारे जीवन कौशल्ये विकसित करणे.

३. भाषिक कौशल्ये विकसित करणे.

४. कार्यालयीन आणि व्यावसायिक कामात मराठी भाषेचा वापर समजून घेणे.

५. भाषेचे जीवनातील महत्त्व समजावून सांगणे.

६. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता निर्माण करणे. 

Faculty: ARTS
Sr.no.
Name
Qualification
Experience
No. of Research Paper Published
1
M.A. , NET
32 years.
03
2
M.A. , NET, MPhil, Ph.D.
18 years
05
3
M.A. , M.Phil. , Ph.D.
2 Months
04
विभागीय ग्रंथालय :

एकूण पुस्तके : २४८

मासिके : ११

ध्वनीफित :०८

चित्रफित : ०३

कार्यशाळा :
  1. मराठी वाड्मय मंडळाचे उद्घाटन : शैक्षणिक वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थी आणि विशेषस्तरावरील इतर विभागाचे विद्यार्थी यांच्या समोर मराठी वाड्मय मंडळाचे उद्घाटन केले जाते. या प्रसंगी प्राचार्यांच्या अध्यक्षतेखाली मान्यवर कवी लेखक अथवा भाषेच्या अंगाने काम करणाऱ्या व्यक्तींच्या हस्ते उद्घाटन केले जाते. 
  2. लेखक तुमच्या भेटीला : मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात अंतर्भूत असलेल्या काही लेखक कवींना प्रत्यक्षात विभागात आमंत्रित केले जाते. त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि लेखक कवींची प्रत्यक्षात मुलाखत आयोजित केली जाते. 
  3. वाचन प्रेरणा दिन : दिनांक १५ ऑक्टोंबर माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी शासकीय परिपत्रकान्वये साजरा केला जातो. या कार्यक्रमात वाचन संस्कृतीविषयी, ‘दिसामाजी काही वाचीतची जावे’ या संकल्पनेतून विविध व्याख्याने आयोजित केली जातात. वाचनाचे संस्कार केले जातात. 
  4. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा : दिनांक १ जानेवारी १५ जानेवारी या कालावधीत शासकीय आदेशान्वये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जातो. संपूर्ण महाविद्यालयातील विद्यार्थी मराठी विभागाने आयोजित केलेल्या या पंधरवड्यात उस्फुर्तपणे सहभाग नोंदवितात. या सप्ताह अंतर्गत हस्ताक्षर स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. भाषेच्या संवर्धनासाठी विविध तज्ञ अभ्यासकांची व्याख्याने आयोजित केली जातात.   
  5. मराठी भाषा गौरव दिन : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी दिनांक २७ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. मराठी भाषेतील कवी आणि कवितांच्या संदर्भात तज्ञ व्यक्तीचे व्याख्यान आयोजित केले जाते. मराठी कवितेच्या संदर्भात उगम, विकास आणि वाटचाल या घटकांचा प्रामुख्याने परिचय विद्यार्थ्यांना व्हावा हा हेतू असतो.    
  6. कविकट्टा :  मराठी विभाग अंतर्गत दर शुक्रवारी “कवी कट्टा” या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांतर्गत एखादे जाणकार प्रसिद्ध कवी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले जातात.  त्यांच्या मार्गदर्शनातून कवितेचे आकलन, कविता रचनाबंद समजून घेतला जातो.  महाविद्यालयाच्या मैदानावर कवी कट्ट्याचे आयोजन केले जाते.  विद्यार्थ्यांच्या कविता सादरीकरण आणि मार्गदर्शकांच्या  कवितेची काही सादरीकरण अशा पद्धतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत होते. विद्यार्थी लिहिते होतात.
  7. शब्दसृष्टी भित्तीपत्र : दर महिन्याच्या विशिष्ट दिवसाचे औचित्य साधून भित्तीपत्रकाचा विषय ठरविला जातो. आणि त्याविषयावर विद्यार्थ्यांकडून भित्तीपत्रकाच्या माध्यमातून   लेखन मागविले जाते. त्याचे मा.प्राचार्यांच्या हस्ते होते. 
  8. गौरविका कात्रण संग्रह : वर्षभरातील घडलेल्या साहित्य, कला आणि संस्कृतीच्या संदर्भात महत्त्वाच्या घटना आणि घडामोडींची कात्रणे विद्यार्थ्यांकडून संकलित केली जातात. यांचे प्रकाशन गौरविका कात्रण संग्रह या नावाने केले जाते.     
  9. मराठी भाषेच्या प्रचार- प्रसारासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन  :  मराठी विभागाच्या वतीने दरवर्षी मराठी भाषा प्रचार प्रसारासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याशिवाय प्रासंगिक स्वरूपात विविध विषयांवर तज्ञ अभ्यासक मार्गदर्शक अभ्यासक साधन व्यक्तींची व्याख्याने आयोजित केली जातात.                                                                      

                                                   

शैक्षणिक सहल :

१. ३१ मे,२०२२-२३ शैक्षणिक सहल  :- पुणे ते आक्षी (अलिबाग)

२ . ०९ मार्च २०२४ एकूण सहभागी विद्यार्थी  :-  शै.सहल ०९ मार्च २०२०

विभागीय उपक्रम :

१) मराठी वाड्मय मंडळ :-

२०१८-२०१९

शैक्षणिक वर्ष २०१८-२०१९ मध्ये वाङ्मय मंडळाचे उद्घाटन प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न महाविद्यालयाच्या मराठी विभागप्रमुख डॉ.निशा भंडारे यांच्या हस्ते झाले. वाड्मयमंडळातून साहित्याविषयी विविध चर्चा करून विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा. साहित्यप्रकारातून नवीन वाङ्मयप्रकारामध्ये लेखन करावे. असे यावेळी त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले. मराठी विभाग प्रमुख प्रा.महादेव रोकडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मोकाशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

  २०१९-२०२०

शैक्षणिक वर्ष २०१९-२०२० मध्ये वाङ्मय मंडळाचे उद्घाटन पुणे आकाशवाणी केंद्राच्या वृत्त निवेदिका या. स्वाती महाळंक यांनी केले. नभोवाणी वरील “रोजगाराच्या नवनवीन संधी” या विषयावर त्या बोलल्या. आकाशवाणी वरील श्रुतिका लेखन आणि करियर या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.

  २०२०-२०२१

यावर्षी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा. कृष्णकुमार गोयल यांनी केले. “मराठी विषय आणि उद्योजकता” याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांनी सखोल मार्गदर्शन केले. “नोकरी करणारे होण्यापेक्षा नोकरी देणारे व्हा हा” संदेश त्यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना दिला.

२०२१-२०२२

महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ.एम यु मुलाणी यांच्या हस्ते यावर्षी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन झाले. “मराठीचे अर्थशास्त्र” या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मराठी भाषेतील मराठी भाषा आणि भाषिक यांचा आर्थिक व्यवहार आणि समायोजन याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला.

 २०२२-२०२३

या शैक्षणिक वर्षी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन प्राचार्य डॉ.गौतम भोंग यांनी केले. उद्घाटन प्रसंगी बोलताना मराठी भाषा आणि लेखन कौशल्य याविषयी विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजन मराठी विभागाने केले. कार्यक्रमाची प्रस्तावना मराठी विभाग प्रमुख प्रा.महादेव रोकडे तर सूत्रसंचालन डॉ शैलेंद्र काळे यांनी केले.

२०२३-२०२४

 महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे सर यांच्या हस्ते यावर्षी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन झाले. उद्घाटन प्रसंगी विद्यार्थ्यांनी नित्य नियमाने काहीतरी वाचत राहावे असा संदेश त्यांनी दिला. वाचनाने जीवन समृद्ध होते सतत काहीना काहीतरी वाचत राहा त्यातून स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. असे यावेळी ते म्हणाले. कार्यक्रमाचे संयोजन आयोजन मराठी विभागाने केले.

 

२) लेखक तुमच्या भेटीला:

२०१८-२०१९

मराठी सिने चित्रपट कलावंत दिग्दर्शक विजय गोखले या लेखक तुमच्या भेटीला कार्यक्रमात उपस्थित होते. कलावंताने माणूस म्हणून जगले पाहिजे आणि माणूस म्हणून जगवले पाहिजे असा छान संदेश त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे संयोजन मराठी विभागाने केले. महाविद्यालयातील अनेक विभागाचे विद्यार्थी या कार्यक्रमात आवर्जून उपस्थित होते.

२०१९-२०२०

मराठी विभागाचा नव युवा कवी  दंगलकार नितीन चंदनशिवे हा यावर्षी मराठी विभागात येऊन गेले. महाविद्यालयीन जीवनातील गतकालाच्या आठवणींना उजाळा देत त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्वतःच्या कवितेच्या जाणिवा विद्यार्थ्यांसमोर उलगडून सांगितल्या. कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभागाने केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण मोकाशी यावेळी अध्यक्षस्थानी होते.

२०२०-२०२१

लेखक कवी अशोक कदम यावर्षी लेखकांनी केला या क्षेत्राखाली विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. लेखनाची आवड आणि वाचन याचे महत्त्व त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

२०२१-२०२२

या शैक्षणिक वर्षांमध्ये मराठी विभागाचा माजी विद्यार्थी आजरा महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी सदिच्छा भेट दिली. भेटी दरम्यान मुलांना मार्गदर्शन केले. विभागातील गतकालीन स्मृतींना उजाळा दिला. संघर्षातून प्राध्यापकापर्यंत झालेला प्रवास ऐकताना विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. कार्यक्रमाचे आयोजन मराठी विभागाने केले. प्रास्ताविक,परिचय मराठी विभागप्रमुख प्रा. महादेव रोकडे यांनी केले.

२०२२-२०२३

लेखक तुमचे भेटीला या सदराखाली यावर्षी रुसाचे अध्यक्ष डॉ. प्रमोद पाब्रेकर आले होते.”प्रज्ञा परिसर प्रकल्प अंतर्गत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी भूषविले. कार्यक्रमाचे संयोजन मराठी विभागातील विद्यार्थ्यांनी केले.

३) १५ आॕक्टोबर : वाचन प्रेरणा दिन 

२०१८-२०१९

१) व्याख्याते : प्राचार्य अरुण मोकाशी

२) व्याख्यान विषय : वाचनाचे महत्व

३) अध्यक्ष : प्राचार्य डॉ. अरुण मोकाशी

प्रास्ताविक : प्रा. महादेव रोकडे (मराठी विभागप्रमुख)

सूत्रसंवादक : प्रा. रूपाली अवचरे

आभार  : डॉ. शैलेंद्र काळे

आयोजन/संयोजन : मराठी विभागातील विद्यार्थी.

२०१९-२०२०

१) व्याख्याते : प्राचार्य डॉ. उर्मिला सडोलीकर

२) व्याख्यान विषय : वाचनाची सवय आणि व्यक्तिमत्त्व विकास

३) अध्यक्ष : प्राचार्य डॉ. उर्मिला सडोलीकर

प्रास्ताविक : प्रा महादेव रोकडे (मराठी विभागप्रमुख)

सूत्रसंवादक : प्रा. रूपाली अवचरे

आभार : डॉ. शैलेंद्र काळे

आयोजन/संयोजन : मराठी विभागातील विद्यार्थी.

२०२०-२०२१

१) व्याख्याते : प्राचार्य डॉ. एम. यु.मुलाणी

२) व्याख्यान विषय : वाचनाची पद्धत

३) अध्यक्ष: प्राचार्य डॉ. एम.यु‌.मुलाणी

प्रास्ताविक : प्रा महादेव रोकडे (मराठी विभागप्रमुख)

सूत्रसंवादक : प्रा. रूपाली अवचरे

आभार : डॉ. शैलेंद्र काळे

आयोजन/संयोजन : मराठी विभागातील विद्यार्थी.

२०२१-२०२२

१) व्याख्याते : प्राचार्य डॉ.उर्मिला सडोलीकर

२) व्याख्यान विषय : वाचनाचे विविध विषय

३) अध्यक्ष: प्राचार्य डॉ. उर्मिला सडोलीकर

प्रास्ताविक : प्रा महादेव रोकडे (मराठी विभागप्रमुख)

सूत्रसंवादक : प्रा. रूपाली अवचरे

आभार : डॉ. शैलेंद्र काळे

आयोजन/संयोजन : मराठी विभागातील विद्यार्थी.

२०२२-२०२३

१) व्याख्याते : प्राचार्य डॉ.संजय चाकणे

२) व्याख्यान विषय : दिसामाजीं काहीतरी वाचतचीं जावें..!

३) अध्यक्ष : प्राचार्य डॉ. संजय चाकणे

प्रास्ताविक : प्रा महादेव रोकडे (मराठी विभागप्रमुख)

सूत्रसंवादक : प्रा. स्वामीराज भिसे

आभार : डॉ. शैलेंद्र काळे

आयोजन/संयोजन : मराठी विभागातील विद्यार्थी.

२०२३-२०२४

१) व्याख्याते : प्राचार्य डॉ.संजय चाकणे

२) व्याख्यान विषय : संस्कार वाचनाचा..!

३) अध्यक्ष: संचालक,मा.राजेंद्र भुतडा

प्रास्ताविक : प्रा महादेव रोकडे (मराठी विभागप्रमुख)

सूत्रसंवादक : प्रा. स्वामीराज भिसे

आभार : डॉ. शैलेंद्र काळे

आयोजन/संयोजन : मराठी विभागातील विद्यार्थी.

 

४) मराठी भाषा संवर्धन पंधरवडा (०१ जानेवारी ते १४ जानेवारी )

२०१८-२०१९

१) व्याख्याते : प्राचार्य डॉ.सडोलीकर

२) व्याख्यान विषय : भाषा आणि मानसशास्त्र

३) राबवलेला उपक्रम : हस्ताक्षर स्पर्धा

४) अध्यक्ष : प्राचार्य डॉ. सडोलीकर

प्रास्ताविक : प्रा. महादेव रोकडे (मराठी विभागप्रमुख)

सूत्रसंवादक : प्रा.रूपाली अवचरे

आभार : डॉ. शैलेंद्र काळे

आयोजन/संयोजन : मराठी विभागातील विद्यार्थी.

२०१९-२०२०

१) व्याख्याते : प्राचार्य डॉ.सडोलीकर

२) व्याख्यान विषय : भाषा आणि व्यक्तिमत्व विकास

३) राबवलेला उपक्रम: मेहंदी स्पर्धा

४) अध्यक्ष : प्राचार्य डॉ. सडोलीकर

प्रास्ताविक : प्रा. महादेव रोकडे (मराठी विभागप्रमुख)

सूत्रसंवादक : प्रा.रूपाली अवचरे

आभार : डॉ. शैलेंद्र काळे

आयोजन/संयोजन : मराठी विभागातील विद्यार्थी.

२०२०-२०२१

१) व्याख्याते : प्राचार्य डॉ. एम.यु.मुलाणी

२)  व्याख्यान विषय : मराठी भाषेतून रोजगाराच्या संधी

३) राबवलेला उपक्रम: रांगोळी स्पर्धा

४) अध्यक्ष : प्राचार्य, डॉ.एम.यू. मुलाणी

प्रास्ताविक : प्रा महादेव रोकडे (मराठी विभागप्रमुख)

सूत्रसंवादक : प्रा.रूपाली अवचरे

आभार : डॉ. शैलेंद्र काळे

आयोजन/संयोजन : मराठी विभागातील विद्यार्थी.

२०२१-२०२२

१) व्याख्याते : डॉ. निशा भंडारे

२) व्याख्यान विषय : स्री चळवळीचे योगदान

३) राबवलेला उपक्रम : वकृत्त्व स्पर्धा

४) अध्यक्ष : प्राचार्य डॉ. सडोलीकर

प्रास्ताविक : प्रा महादेव रोकडे (मराठी विभागप्रमुख)

सूत्रसंवादक : प्रा.रूपाली अवचरे

आभार : डॉ. शैलेंद्र काळे

आयोजन/संयोजन : मराठी विभागातील विद्यार्थी.

२०२२-२०२३

१) व्याख्याते : प्राचार्य डॉ. संजय चाकणे

२) व्याख्यान विषय : दिसामाजीं काहीतरी वाचतच जावे…!

३) राबवलेला उपक्रम : काव्यवाचन स्पर्धा

४) अध्यक्ष: प्राचार्य डॉ. संजय चाकणे

प्रास्ताविक : प्रा. महादेव रोकडे (मराठी विभागप्रमुख)

सूत्रसंवादक : प्रा.रूपाली अवचरे

आभार : डॉ.शैलेंद्र काळे

आयोजन/संयोजन : मराठी विभागातील विद्यार्थी.

२०२३-२०२४

१) व्याख्याते : प्राचार्य डॉ. संजय चाकणे

२) व्याख्यान विषय : साहित्य आणि समाज

३) राबवलेला उपक्रम: निबंध स्पर्धा

४) अध्यक्ष : प्राचार्य डॉ. संजय चाकणे

प्रास्ताविक : प्रा.महादेव रोकडे (मराठी विभागप्रमुख)

सूत्रसंवादक : प्रा.स्वामीराज भिसे

आभार : डॉ. शैलेंद्र काळे

आयोजन/संयोजन : मराठी विभागातील विद्यार्थी.

 

५) मराठी भाषा गौरव दिन दि.२७ फेब्रुवारी  

२०१८-२०१९

१. व्याख्याते : प्रा.प्रकाश दळवी

२) व्याख्यान विषय : मराठी भाषेचा गौरव

३) अध्यक्ष : प्राचार्य डॉ. अरुण मोकाशी

प्रास्ताविक  : प्रा. महादेव रोकडे (मराठी विभागप्रमुख)

सूत्रसंवादक: प्रा.रूपाली अवचरे

आभार : डॉ. शैलेंद्र काळे

आयोजन/संयोजन : मराठी विभागातील विद्यार्थी.

२०१९-२०२०

१) व्याख्याते :प्राचार्य डॉ. अरुण मोकाशी

२) व्याख्यान विषय : “रामायण महाभारतातील मिथके”

३) अध्यक्ष : प्राचार्य डॉ. अरुण मोकाशी

प्रास्ताविक : प्रा. महादेव रोकडे (मराठी विभागप्रमुख)

सूत्रसंवादक : प्रा. रूपाली अवचरे

आभार : डॉ. शैलेंद्र काळे

आयोजन/संयोजन : मराठी विभागातील विद्यार्थी.

२०२०-२०२१

१) व्याख्याते : प्राचार्य डॉ. उर्मिला सडोलीकर

२) व्याख्यान विषय : मराठी भाषेतून व्यक्त व्हा..!

३) अध्यक्ष : प्राचार्य डॉ. उर्मिला सोडलीकर

प्रास्ताविक  : प्रा. महादेव रोकडे (मराठी विभागप्रमुख)

सूत्रसंवादक: प्रा. रूपाली अवचरे

आभार : डॉ. शैलेंद्र काळे

आयोजन/संयोजन : मराठी विभागातील विद्यार्थी.

२०२१-२०२२

१) व्याख्याते : प्रा.एम.यु.मुलाणी

२) व्याख्यान विषय : मी मराठी…!

३) अध्यक्ष : प्राचार्य डॉ. मुलाणी

प्रास्ताविक : प्रा. महादेव रोकडे (मराठी विभागप्रमुख)

सूत्रसंवादक : प्रा.रूपाली अवचरे

आभार : डॉ. शैलेंद्र काळे

आयोजन/संयोजन : मराठी विभागातील विद्यार्थी.

२०२२-२०२३

१) व्याख्याते : प्राचार्य डॉ. संजय चाकणे

२) व्याख्यान विषय : मातृभाषा मराठी

३) अध्यक्ष : प्राचार्य डॉ. संजय चाकणे

प्रास्ताविक : प्रा. महादेव रोकडे (मराठी विभागप्रमुख)

सूत्रसंवादक : प्रा. स्वामीराज भिसे

आभार : डॉ. शैलेंद्र काळे

आयोजन/संयोजन : मराठी विभागातील विद्यार्थी

२०२३-२०२४

१) व्याख्याते : प्राचार्य डॉ. संजय चाकणे

२) व्याख्यान विषय : मराठीचे संशोधन कसे करावे..?

३) अध्यक्ष : प्राचार्य डॉ. संजय चाकणे

प्रास्ताविक : प्रा. महादेव रोकडे (मराठी विभागप्रमुख)

सूत्रसंवादक : प्रा. स्वामीराज भिसे

आभार : डॉ. शैलेंद्र काळे

आयोजन/संयोजन : मराठी विभागातील विद्यार्थी.

६) शब्दसृष्टी भित्तीपत्रक

पहिला अंक : २६ नोव्हेंबर २०२२

दुसरा अंक : २७ फेब्रुवारी  २०२३

तिसरा अंक : ०८ मार्च २०२३

चौथा अंक : १७ मार्च २०२३

पाचवा अंक: २४ मार्च २०२३

सहावा अंक: ३१ मार्च २०२३

सातवा अंक: १४ एप्रिल २०२३

आठवा अंक: २२ एप्रिल २०२३

नववा अंक : २८ एप्रिल २०२३

७) कविकट्टा

पहिला अंक : २६ नोव्हेंबर २०२२

दुसरा अंक : २७ फेब्रुवारी  २०२३

तिसरा अंक : ०८ मार्च २०२३

चौथा अंक : १७ मार्च २०२३

पाचवा अंक: २४ मार्च २०२३

सहावा अंक: ३१ मार्च २०२३

सातवा अंक: १४ एप्रिल २०२३

आठवा अंक: २२ एप्रिल २०२३

नववा अंक : २८ एप्रिल २०२३

माजी विद्यार्थी

अ.क्र.

विद्यार्थ्यांचे नाव

पद

डॉ.निशा भंडारे

प्रोफेसर व मराठी विभागप्रमुख, मॉडर्न महाविद्यालय, पुणे

सुनील भोईर

महिला व बालकल्याण अधिकारी, पुणे

डॉ. आनंद बल्लाळ

प्रोफेसर व मराठी विभागप्रमुख आजरा महाविद्यालय, आजरा  जि.कोल्हापूर

श्री. नितीन शिंदे

शिक्षक,पर्यवेक्षक लालबहादुर हायस्कुल, पुणे

उदयकुमार बनसोडे

शिक्षक,माध्यमिक शाळा, P.C.M.C.,थेरगाव

दीपाली पोळ

शिक्षिका  चाटे कोचिंग क्लासेस, पुणे

डॉ.समिंदर घोक्षे

सहा.प्राध्यापक, वाडिया कॉलेज,पुणे

गणेश पाटील

शिक्षक

नितीन चंदनशिवे

व्यावसायिक लेखक, चित्रपट दिग्दर्शक

१०

विशाखा कांबळे

महाराष्ट्र पोलीस अधिकारी

११

आशिष टिळक

अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक सहा.संपादक कलर्स टी.व्ही.मराठी

१२

कविता देवकर

शिक्षिका, संगणक इंस्टीट्यूट, भोसरी

१३

डॉ. प्रकाश दळवी

व्यावसायिक सूत्रसंचालक

१४

अमरजित गायकवाड

नाट्य-चित्रपट व्यावसायिक दिग्दर्शक

१५

शब्बीर शेख

शिक्षक, क्लारा ग्लोबल इंटरनॅशनल स्कूल,हडपसर

Departmental Gallery

Scroll to Top