किल्ला संरक्षण आणि संवर्धन दोन दिवशीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा,विसापूर

दिनांक 12/02/24 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि खडकी शिक्षण संस्थेचे टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य, व विज्ञान महाविद्यालय खडकी, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ऐतिहासिक स्थळे दत्तक योजना अंतर्गत दोन दिवशीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळा विसापूर किल्ला संरक्षण आणि संवर्धन दिनांक 12 फेब्रुवारी 2019 दिनांक 13 फेब्रुवारी 2019 या शिबिराचे आज उदघाटन खडकी शिक्षण संस्थेचे सहसचिव तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली खडकी शिक्षण संस्थेचे सचिव माननीय श्री. आनंदजी छाजेड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी खडकी शिक्षण संस्थेचे संचालक माननीय श्री. रमेश अवस्थी त्याचबरोबर लोहगड नागरी पतसंस्थेचे चेअरमन तथा पुणे जिल्हा परिषद पुणे चे सदस्य माननीय श्री. गणेश धनिवले व गावचे माजी सरपंच अरुण शेठ काळे उपस्थितीत होते. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी आपल्या मार्गदर्शनात गड किल्ले संवर्धनाची आवश्यकता ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे संवर्धन करणे का आवश्यक आहे याबद्दल माहिती दिली तसेच त्यांनी या विसापूर किल्ला बद्दल इतिहास विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतून युवकांचा कसा विकास होतो तसेच या योजनेचे महत्व विषद केले. यावेळी उद्घाटक म्हणून माननीय श्री. आनंद छाजेड यांनी विद्यार्थ्यांना ऐतिहासिक अभ्यास करणे का आवश्यक आहे तसेच इतिहास समजून घेण्याची गरज तसेच प्रत्यक्ष या ऐतिहासिक वास्तू चे जतन करणे किती आवश्यक आहे. या बद्दल मत व्यक्त केले. यावेळी उपस्थित गणेश जी धानिवले यांनी परिसरातील किल्ल्यांची माहिती देऊन विद्यार्थ्यांना गडकिल्ले संवर्धन याबद्दल माहिती दिली. सदरकार्यशाळेत पुणे , अहमदनगर, नाशिक सावित्रीबाई फुले पाजणे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयाचे 110 स्वयंसेवक सहभागी झाले .या कार्यशाळेचे समन्वयक आपल्या महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. सुचेता दळवी, कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश काळे ,प्रा. मयूर कढणे,डॉ. पद्माकर घुले, प्रा.ज्योती वाघमारे, डॉ. नागेंद्र जंगम श्री.राजेंद्र जगताप , रा. से. यो. चे स्वयंसेवक उपस्थित होते.

Scroll to Top