सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय खड़की यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचया वतीने मूल्य शिक्षण अंतर्गत  पर्यावरण संवर्धन एक दिवसीय

जिला स्तरीय कार्यशाळेचे आयोजन शनिवार दिनांक 24 जानेवरी 2026 रोजी प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यशाळेचे उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राजेंद्र लेले यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात सांगितले की पर्यावरण संवर्धन करणे काळाची गरज असल्याने ती आपली वैयक्तिक जबाबदारी बनली आहे.या कार्यशाळेमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूगोल विभागातील डॉ.रवींद्र जायभाये आणि टेरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. विनिता आपटे यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.महादेव रोकडे विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा.स्वामी राज भिसे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. अविनाश कोल्हे प्रा.अर्चना तारू प्रा.जितेंद्र मडके आणि समिती सदस्य प्रा.मयूर कढणे प्रा. कविता सिकदर प्रा. सोनाली मॅडम आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी चंचल दास या विद्यार्थिनी केले तर आभार प्रा. अर्चना तारु यांनी मानले.

Comments (0)

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top