महाविद्यालयामध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या देशभक्तीच्या उत्साहात साजरा केला. त्याची सुरुवात मा.सौ. सपना आनंद छाजेड नगर सेविका पुणे म.न.पा. यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला, त्यासोबत राष्ट्रगीत व देशभक्तीपर गीत आणि एनसीसी कॅडेट्सनी शिस्तबद्ध, प्रभावी मार्च-पास्ट सादर केले. अध्यक्ष श्री. कृष्णकुमार गोयल यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन व काही जुन्या आठवणीना उजाळा दिला. या नंतर श्री. आनंद चंद्रकांत छाजेड चिटणीस, डॉ. संजय चाकणे सहचिटणीस व प्राचार्य टि. जे. कॉलेज या सर्व मान्यवरांनी आपले विचार व्यत्त केले. संविधानाचे महत्त्व आणि राष्ट्र उभारणीत तरुणांची कर्तव्ये अधोरेखित करणारी प्रेरणादायी भाषणे देऊन समारंभ सुरू राहिला. विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय विषयांवर आधारित भावपूर्ण देशभक्तीपर गाणी आणि उत्साही नृत्य सादर केल्याने वातावरण देशभक्तीच्या उत्साहाने भरून गेले.
श्री. अनिल मेहता उपाध्यक्ष, श्री. सुरजभान आगरवाल सहचिटणीस, सर्व प्रशासक मंडळ सदस्य श्री. उध्दव घाडगे प्राचार्य आलेगांवकर मा. विद्यालय व सी. के. गोयल ज्यु. कॉलेज श्रीमती जयश्री माकर मुख्याध्यापिका आलेगांवकर प्राथ. विद्यालय, श्री. दिनेश लोखंडे प्राचार्य श्रीमती शकुंतला हेमराज मुथा वित्रकला महाविद्यालय, सौ. सुनंदा चपटे मुख्याध्यापिका जी. ओम. इराणी कन्याशाळा, सौ. सरीता नायर प्राचार्या चेतन दत्ताजी गायकवाड इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्यु. कॉलेज, सौ. शुभांगी बरेल्लू प्रभारी संचालीका श्रीमती प्रमिला मुनोत बाल शिक्षण मंदिर, कु. अंजना कांबळे मुख्याध्यापिका खडकी शिक्षण संस्था रात्र प्रशाला. या सर्वांच्या उपस्थिती संपन्न झाला.




