दि.29/01/2024,टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयामध्ये ‘यशवंतराव चव्हाण ‘ व्याख्यानमाला तिसरे सत्र संपन्न झाले . आज या व्याख्यानमालेच्या तिसऱ्या सत्राचे व्याख्याते प्रा.डॉ.ज्ञानेश्वर जाधवर सर व व्याख्यानाचा विषय ” डिजिटल मध्यम साक्षरता ” हा होता.या व्याख्यानास मा.उपप्राचार्य अरुण शेलार सर,कविता शिकदर, डॉ. तेजस्विनी शेंडे, डॉ. पद्माकर घुले, प्रा. शुभम पठारे व प्रा.डॉ.लोंढेसर व केंद्र कार्यवाह प्रा.ज्योती वाघमारे व 54 विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना कळेल अशा सहज सोप्या भाषेत जाधवर सरांनी PPT च्या माध्यमाने व्याख्यान घेतले. Social media चा वापर करताना आर्थिक, सामाजिक नैतिक, भावनिक स्तरावर होणाऱ्या फसवणूकी कशा टाळता येतील याची माहिती जाधवर सरांनी दिली. मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन सत्राची व तिनदिवसीय ‘यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेची सांगत झाली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ व खडकी शिक्षण संस्था संचालित टिकाराम जगन्नाथ महाविद्यालय बहि:शाल केंद्र अंतर्गत आयोजित केलेल्या दोनही व्याख्यानमालेसाठी मा. प्राचार्य डॉ. संजय चाकणे सरांच्या मार्गदर्शनामुळे या व्याख्यानमालेचे नियोजन व आयोजन यशस्वीपणे करणे शक्य झाले, तसेच . मा उपप्राचार्य व वाणिज्य विभागप्रमुख प्रा. अरुण शेलार सर यांचे ही मोलाचे मार्गदर्शन मिळाले सर्व व्याख्यानमालांसाठी सर उपस्थित होते, आलेल्या व्याख्यात्यांचा स्वागत व सत्कार सरांच्या हस्ते करण्यात आला सर्व व्याख्याना साठी सरांनी वेळ दिला.तसेच मराठी विभागाचे मा. रोकडेसर, डॉ. शैलेंद्र काळे यांचे ही सहकार्य मिळाले.वाणिज्य विभागाच्या प्रा.कविता शिकदर , अर्थशास्त्र विभागाचे डॉ. दिपाली खोडदे, डॉ. तेजस्विनी शेंडे डॉ.पद्माकर घुले व मयूर कढणे , भूगोल विभागातील प्रा. शुभम पठारे व सर्व विभागातील प्राध्यापक, नॉन टीचिंग स्टाफ व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहकार्याने दोन तिनदिवसीय व्याख्यानमाला आपल्या महाविद्यालयात यशस्वीपणे संपन्न झाल्या. सर्वांचे मनापासून आभार व धन्यवाद