टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात वक्तृत्व व नेतृत्व कार्यशाळा संपन्न झाली.

आजचा दिवस खऱ्या अर्थाने विद्यार्थी नेतृत्वाचा उत्सव ठरला…!*

वक्तृत्व व नेतृत्व या महत्त्वाच्या कार्यशाळा केवळ पार पडल्या नाहीत, तर मुलांनी स्वतःच्या हातांनी घडवल्या.

सूत्रसंचालन असो, पाहुण्यांचा नेटक्या शब्दांत परिचय असो, व्हिडिओ शूटिंग, फोटोग्राफी, त्यातून रील्स तयार करणे, रजिस्ट्रेशन अशी प्रत्येक जबाबदारी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने उचलली. एवढंच नव्हे, तर एनएसएसच्या मुलांनी स्वयंपाकातही मनापासून हातभार लावला.

गणेश मामांनी बनवलेली कोशिंबीर आणि व्हेज बिर्याणी तर अक्षरशः अफलातून प्रेम, सहभाग आणि संघभावनेची चव होती त्यात!

हे सगळं पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली मुलांना संधी दिली, विश्वास दिला, तर ते नेतृत्व करतात.

आजचा उपक्रम म्हणजे सहभाग वाढवण्याच्या दिशेने उचललेलं ठोस पाऊल आणि ते निश्चितच प्रचंड कौतुकास्पद आहे.

या प्रेरणादायी उपक्रमासाठी

अविनाश कोल्हे, अर्चना तारू आणि जितेंद्र मडके यांचे तसेच माननीय प्राचार्यांचे मनापासून अभिनंदन!

आज विद्यार्थ्यांच्या माध्यमातून जे घडलं, ते उद्याच्या जबाबदार समाजाची नांदी आहे. 🙌🌱

Comments (0)

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top